Sony Xperia XZ2 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. सोनी कंपनीचा हा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन जगातील पहिला 4के एचडीआर मूवी रेकॉर्डींग असलेला फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सोनी एक्सपीरिया एक्सझेड-2 ची किंमत 72 हजार 990 रुपये इतकी असून कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन असल्याचं सांगितलं जात आहे. 1 ऑगस्टपासून या फोनची विक्री सुरू होत असून देशभरातील सोनीचे सर्व सेंटर्स आणि काही ठरावीक दुकानांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

स्पेसिफिकेशन्स –
सोनी एक्सपीरिया एक्सझेड-2 स्मार्टफोनमध्ये में 5.7 इंच फुल एचडी+ ट्रायल्युमिनस स्क्रीन असून रिझोल्यूशन 1080×2160 पिक्सल आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्यूअल सिम सपॉर्ट करतो, फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आलाय. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेला हा फोन अॅन्ड्रॉइड ओरियो ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. याशिवाय मायक्रोएसडी कार्डद्वारे 400 जीबीपर्यंत फोनमधील स्टोरेज वाढवता येतं. ऑटोफोकस बर्स्ट, हाईब्रिड ऑटोफोकसच्या पर्यायासह एक्सपीरिया XZ2 मध्ये 19 मेगापिक्सलचा मोशन आय रियर कॅमेरा आहे. 960 फ्रेम प्रति सेकंद सुपर स्लो मोशनमध्ये फुल एचडी व्हिडीओ याद्वारे रेकॉर्ड केला जाऊ शकतो. याशिवाय 5-एक्सिस स्टेबिलायझेशन आणि 3 डी कॅप्चरिंगसह स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे, कनेक्टिव्हिटीसाठी सोनी एक्सपीरिया एक्सझेड-2मध्ये ब्लूटूथ 5.0 वायरलेस टेक्नॉलजी, यूएसबी 3.1, 4जी Volte, जीएसएम, जीपीआरएस/एज, वाय-फाय आणि जीपीएस फिचर्स आहेत. 3180 एमएएच पावर असलेली बॅटरी फोनमध्ये आहे.