News Flash

भन्नाट ऑफर्स : रेडमी नोट 7 प्रो, नोट 7S आणि Y3 सह अनेक स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घसघशीत सवलतीसह खास सेलचं आयोजन

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर  Xiaomi ने भारतात Xiaomi Independence Day Sale ची घोषणा केली आहे. आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झालेला हा सेल 11 ऑगस्टपर्यंत सुरू असणार आहे. Mi.com या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाशिवाय फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या संकेतस्थळांवर आयोजित करण्यात आलेल्या सेलमध्येही कंपनीने आपले स्मार्टफोन खास ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. फ्लिपकार्टवर 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान सेल आहे, तर अॅमेझॉनवर 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान Amazon Freedom Sale आहे.

Redmi Note 7 Pro –
सेलमध्ये रेडमी नोट 7 प्रो (4GB+64GB) मॉडल 15,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 6GB+64GB स्टोरेज व्हेरिअंट 16,999 रुपयांऐवजी 13,999 रुपये आणि 6GB+128GB स्टोरेज व्हेरिअंट 17,999 रुपयांऐवजी 15,999 रुपयांत उपलब्ध आहे.

Redmi Y3 –
सेल्फी प्रेमींसाठी 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असलेला Redmi Y3 हा फोन देखील सेलमध्ये उपलब्ध आहे. यातील 3GB+32GB स्टोरेज व्हेरिअंट 11,999 रुपयांऐवजी 8,999 रुपये आणि 4GB+64GB स्टोरेज व्हेरिअंट 13,999 रुपयांऐवजी 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Redmi Note 7S –
या स्मार्टफोनचं 3GB+32GB स्टोरेज व्हेरिअंट मॉडल 9,999 रुपये आणि 4GB+64GB स्टोरेज व्हेरिअंट 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Redmi Note 6 Pro –
रेडमी नोट 6 प्रोच्या 6GB+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये आहे. पण सेलमध्ये भरमसाठ सवलतीसह हा स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Redmi 6 Pro –
रेडमी 6 प्रो च्या 4GB+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,499 रुपये आहे, पण सेलमध्ये हा फोन 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Redmi 6
रेडमी 6 हा स्मार्टफोन 10 हजार 499 रुपयांऐवजी 6 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही किंमत फोनच्या 3GB+64GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे.

Redmi 6A
7,999 रुपये किंमतीचा रेडमी 6A केवळ 5 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत 2GB+32GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी असणार आहे.

Redmi Y3
या सेलमध्ये Redmi Y3 चं 3GB + 32GB स्टोरेज मॉडल 8 हजार 999 रुपयांमध्ये तर 4GB + 64GB स्टोरेज मॉडल 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Redmi 7
सेलमध्ये या फोनवर देखील सवलत असून फोनचं 2GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिअंट 7 हजार 499 रुपये आणि 3GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिअंट 8 हजार 499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Redmi Y2
13,499 रुपये किंमतीचा रेडमी Y2 सेलमध्ये 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. ही किंमत 4GB+64GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 2:38 pm

Web Title: special sale for independence day from xiaomi amazon and flipkart know all offers on best smart phones sas 89
Next Stories
1 Huawei च्या ‘पॉप-अप किंग’ स्मार्टफोनचा फ्लॅशसेल, ‘या’ आहेत आकर्षक ऑफर्स
2 Sushma Swaraj Passed away : सुषमा स्वराज यांच्या मृत्यूचे कारण ठरलेला ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’ असतो तरी काय?
3 जाणून घ्या हार्ट अ‍ॅटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यातला फरक
Just Now!
X