जर तुम्ही स्टेट बँकेचं योनो अॅप वापरत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. योनो प्लॅटफॉर्मद्वारे बँक आपात्कालिन कर्ज देत असल्याची वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल झालं होतं. तसंच बँक ४५ मिनिटांच्या आत ५ लाख रुपयांपर्यंत आपात्कालिन कर्ज देत असल्याचंही सांगण्यात आलं होतं. तसंच सहा महिन्यांनंतर या कर्जाचे हप्ते घेण्यास सुरूवात होणार असल्याचा दावा काही जणांनी केला होता. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून बँक योनो अॅपद्वारे अशा प्रकारचं कोणतंही कर्ज देत नसल्याचं स्पष्टीकरण स्टेट बँकेकडून देण्यात आलं आहे.
“योनोच्या माध्यमातून बँक कर्ज देत आहे अशा प्रकारचं वृत्त मोठ्या प्रमाणात परसत आहे. स्टेट बँकेकडून अशाप्रकारचं कोणतंही कर्ज देण्यात येत नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आम्ही ग्राहकांना करत आहोत,” असं स्टेट बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. “करोना व्हायरसमुळे उत्पन्न झालेल्या संकटामुळे ज्या लोकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहेत त्यांसाठी प्री अप्रुव्ह्ड कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे,” असंही बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
We urge our customers not to believe in any offer or claim circulated on Social Media unless it’s validated from our official handles. #StopRumours #FakeNews #FactCheck pic.twitter.com/jtYi8zXVuu
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 10, 2020
२०१७ मध्ये अॅपची सुरूवात
YONO म्हणजेच ‘यू ओनली नीड वन’ हा स्टेट बँकेचा एक डिजिटल सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे ग्राहकांना बँकींग, खरेदी, लाइफस्टाईल आणि गुंतवणुकीची एकाच ठिकाणी सुविधा मिळते. या अॅपची सुरूवात २०१७ मध्ये झाली होती. या अॅपच्या मदतीनं स्टेट बँकेच्या ग्राहकांना देशभरातील कोणत्याही स्टेट बँकेच्या एटीएममधून कार्डाशिवायही पैसे काढण्याची सुविधा देण्यात येते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 2:05 pm