News Flash

पोटदुखीतून मानसिक आजारांची पूर्वसूचना

अभ्यास ‘डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड सायकोपॅथॉलॉजी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

आई-वडील विभक्त होण्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या मुलांमध्ये पोटाचे (पचनमार्गाचे) विकार होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पुढील आयुष्यात त्यांच्यात मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबतचा अभ्यास ‘डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड सायकोपॅथॉलॉजी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. पोटाच्या दुखण्याची लक्षणे दिसत असलेल्या मुलांमध्ये याचा परिणाम मेंदू आणि वर्तणुकीवर होऊ शकतो. ही मुले जसजशी वयाने वाढत जातात, तसतशी ही समस्या जाणवू लागते, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. यासंदर्भात अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक निम टोट्टेनहॅम यांनी सांगितले की, ‘डॉक्टरांकडे जाणाऱ्या बहुतांश मुलांची तक्रार ही पोटदुखीबाबत असते.’

मुलांमध्ये दिसून येणारी ही पोटदुखीची लक्षणे  भविष्यात त्यांना भेडसावू शकणाऱ्या मानसिक आजाराच्या धोक्याची सूचना देणारी असू शकतात, असे आम्ही केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे, असे ते म्हणाले. पोट आणि मेंदू यांच्यात जवळचा संबंध असल्याचे शास्त्रज्ञांना बऱ्याच कालावधीपासून माहीत आहे. पोटदुखीची तक्रार असलेल्या प्रौढांपैकी जवळपास निम्म्या लोकांच्या पूर्वायुष्यात मानसिक आघात किंवा अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांना बालपणी असा आघात सहन करावा लागला नाही, त्यांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. अशा आघातामुळे पोटदुखी आणि मानसिक समस्या उद्भवण्याची जोखीम वाढते, असे प्रौढांमध्ये केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे; पण मुलांमध्ये असा अभ्यास फारच कमी झालेला आहे, अशी माहिती कोलंबिया विद्यापीठातील डॉक्टरेटोत्तर संशोधनाचे विद्यार्थी ब्रिडगेट कॅलाघन यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 11:18 pm

Web Title: stomach pain mental illness
Next Stories
1 मोबाइल हँग होतोय? ‘या’ युक्त्या वापरुन बघा
2 #WorldIdliDay : मसाला इडली, इडली मंचुरियन आणि बरंच काही..
3 जीवाणू चाचणीतून यकृत रोगांचे निदान
Just Now!
X