News Flash

कामाचा तणाव हृदयासाठी धोकादायक

तणावपूर्ण नोकरीत आपल्या कामाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कामाच्या तणावामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती जलद किंवा अनियमित होण्याचा धोका असून यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. हा अभ्यास युरोपियन जर्नल आफ प्रिव्हेन्टिव्ह कारर्डिओलाजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. वय, लिंग आणि शिक्षण आदी घटक समायोजित केल्यानंतर कामाच्या ठिकाणी तणावामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती जलद किंवा अनियमित होण्याचे प्रमाण ४८ टक्क्यांनी वाढते, असे आढळले.

तणावपूर्ण नोकरीत आपल्या कामाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. तणाव कमी करण्यासाठी कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना परिपूर्ण संसाधने उपलब्ध व्हावीत याची काळजी घ्यायला हवी असे स्वीडनमधील जोकोंपिंग विद्यापीठाचे प्राध्यापक एलेनॉर फॅ्रन्सन यांनी म्हटले. कर्मचाऱ्यांना आरामासाठी वेळ दिला गेला पाहिजे अणि कार्यालयातील वातावरणात कशा प्रकारे सुधारणा व्हायला हवी याबाबत वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांच्या सूचना ऐकणे गरजेचे असल्याचे फॅ्रन्सन यांनी सांगितले. एट्रियल फिबरीलेशन हा हृदयाच्या ठोक्यांची गती अनियमित करणारा आजार आहे. छातीत धडधडणे, कमकुवतपणा, थकवा, चक्कर येणे, दम लागणे ही याची लक्षणे आहेत.

२० ते ३० टक्के हृदयरोगांच्या झटक्यांसाठी हा विकार कारणीभूत असून यामुळे अकाली मृत्यूचा धोका असल्याचे संशोधकांनी सांगितले. एट्रियल फिबरीलेशन या समस्येचा भरपूर लोक सामना करीत असून यावर आळा घालण्यासाठी उपाय शोधणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कामाच्या तणावपूर्ण वातावरणामुळे याचा काय परिणाम होतो याबाबत अधिक माहिती मिळविणे गरजेचे आहे. या अभ्यासात १३,२०० लोकांनी सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:48 am

Web Title: stress and heart health
Next Stories
1 जाणून घ्या लवकरच लाँच होणाऱ्या इलेक्ट्रीक स्कूटरविषयी…
2 कर्ज घेताय? या पर्यायांचाही विचार करा
3 अॅप्रिकोट खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
Just Now!
X