जर तुम्ही Incognito मोडचा वापर करुन पॉर्न व्हिडिओ पाहत असाल आणि याबाबत कोणालाच काही कळणार नाही असा तुमचा समज असले तर तुम्ही पूर्णतः चुकीचे आहात. कारण गुगल, फेसबुक इतकंच काय तर ओरेकल क्लाउड यांसारखी संकेतस्थळं एखाद्याने पाहिलेल्या पॉर्न वेबसाइट्स लपूनछपून ट्रॅक करत असतात. Incognito मोडमध्ये केवळ तुमची सर्च हिस्ट्री तुमच्या उपकरणामध्ये सेव्ह होत नाही. माइक्रोसॉफ्ट, कार्नेगी मेलन यूनिवर्सिटी आणि युनिवर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

या सर्वेक्षणात 22484 पॉर्न वेबसाइट्सचा अभ्यास केल्यानंतर 93 टक्के पेज ट्रॅक केले जातात आणि डेटा थर्ड पार्टीला दिला जातो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. केवळ 17 टक्के पॉर्न वेबसाइट एनक्रिप्शनचा वापर करतात असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

गुगल 74 टक्के डेटा ट्रॅक करतं –
या अहवालानुसार गुगल नंबर-1 थर्ड पार्टी कंपनी आहे. गुगल किंवा याच्या इतर प्लॅटफॉर्मवरुन 74 टक्के साइट, ओरेकल 24 टक्के आणि फेसबुकने 10 टक्के साइट्स ट्रॅक केल्यात. अधिकांश पॉर्नोग्राफी असलेल्या कंपन्या युरोपमध्ये आहेत असंही अहवालात समोर आलं आहे.

डेटाचा काय होतो वापर –
गुगल, फेसबुक या डेटाचं कार करतात याबाबत नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, हा डेटा अॅडव्हर्टायझिंग प्रोफाइल डेव्हलप करण्यासाठी या डेटाचा वापर केला जात असावा अशी शक्यता शोधकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

गुगल आणि फेसबुकचा नकार –
याबाबत गुगलच्या एका प्रवक्त्याने न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना, आम्ही युजर्सच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीच्या आधारे कोणत्याही प्रकारच्या अॅडव्हर्टायझिंग प्रोफाइल डेव्हलप करण्यावर विश्वास ठेवत नाही. तसंच आम्ही कोणत्याही पॉर्न संकेतस्थळावर गुगल अॅड्स दाखविण्याविरोधात आहोत असं म्हटलं. या प्रकरणावर फेसबुकनेही गुगलप्रमाणेच उत्तर दिलं आहे. बिझनेच्या उद्देशाने पॉर्न वेबसाइट ट्रॅक करण्याची परवानगी कंपनी देत नाही असं फेसबुकने म्हटलंय.

2017 मध्ये पॉर्नहब वेबसाइटवर 28.5 अब्जवेळेस व्हिजिट करण्यात आलंय. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला 50 हजार युजर्स या वेबसाइटवर जाऊन सर्च करतात. दरमहिन्याला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि ट्विटरवर एकूण जेवढे युजर व्हिजिट करत नाहीत त्याहून कितीतरी प्रमाणात अधिक युजर केवळ एका पॉर्न साइटला व्हिजिट करतात.