28 May 2020

News Flash

Mahindra Scorpio : खिशाला परवडणाऱ्या दरात करा स्कॉर्पिओचा कायापालट

स्कॉर्पिओचा हा नवा कायापालट पाहताचक्षणी तुम्हाला अमेरिकन गुप्तचर यंत्रणांकडून वापरण्यात येणाऱ्या अफलातून कार्सची आठवण आल्यावाचून राहणार नाही.

छाया सौजन्य- FINANCIAL EXPRESS

सध्याच्या जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टींना महत्त्वं दिलं जातं, त्यातच आता महागड्या आणि तितक्याच आकर्षक अशा कार्सचाही समावेश झाला आहे. खिशाला परवडेल अशा दरात आणि सर्व ठिकाणी नेता येईल असं स्वत:चं एखादं तरी वाहन, कार असावी असं अनेकांचच स्वप्न असतं. स्वप्नांची ही वाट येऊन एका अशा एका थांब्यावर थांबते ज्याला अनेकांचीच पसंती असते. तो थांबा म्हणजे महिंद्रा स्कॉर्पिओचा Mahindra Scorpio. पंजाबच्या रस्त्यांपासून ते अगदी केरळच्या समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या रस्त्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी एसयूव्हीला पसंती दिली जाते. अशा या एसयूव्हीला ग्राहकांच्या मागणी आणि गरजांनुसार नवा टच देण्यात आला असून, ती खिशाला परवडेल अशा दरात बाजारात आणली आहे.

एसपी डिझाईन स्टुडिओने स्कॉर्पिओचा हा नवा लूक डिझाईन केला असून, Ford Raptor फोर्ड रॅप्टरपासून त्यासाठीची प्रेरणा घेण्यात आली आहे. स्कॉर्पिओचा हा नवा कायापालट पाहताचक्षणी तुम्हाला अमेरिकन गुप्तचर यंत्रणांकडून वापरण्यात येणाऱ्या अफलातून कार्सची आठवण आल्यावाचून राहणार नाही. उंच आणि अवाढव्य वाटणाऱ्या या स्कॉर्पिओमध्ये एकाच वेळी एसयूव्ही आणि पिकअप वेहिकलची झलक पाहायला मिळत आहे. फोर्ड रॅप्टरपासून प्रेरित असलेल्या या स्कॉर्पिओच्या बंपर आणि हेडलाइटचं डिझाईनही प्रचंड लक्षवेधी आहे. याच्या हेडलॅंप क्लस्टरमध्ये उभ्या रेषेत प्रोजेक्टर हेडलँप लावण्यात आले असून, पुढच्या बंपरवर एलइडी फॉग लँप लावण्यात आले आहेत.

कारसोबत देण्यात आलेल्या जादाचा टायर हा मागच्या बाजूला अशा पद्धतीने बसवण्यात आला आहे, जो पाहता हे पिकअप वेहिकल असल्याचाच भास होतोय. पण, याच्या इंजिनमध्ये काहीच बदल करण्यात आले नसून, सर्व यंत्रणा ही 2.2L इंजिनवरच चालेल.

वाचा : मोबाईल स्लो झालाय? ‘या’ युक्त्या वापरुन बघा

Mahindra Scorpio Mahindra Scorpio inspired by Ford Raptor

ही स्वप्नवत स्कॉर्पिओ एका वेगळ्याच रुपात सादर करण्यासाठी एसपी डिझाईन स्टुडिओला दोन महिन्यांचा कालावधी लागला. आता तुम्ही म्हणाल की हॉलिवूड चित्रपटांप्रमाणे लूक असणारी ही स्कॉर्पिओ म्हणजे आपल्या आवाक्यात न येणारी गोष्टच जणू. पण, तसं नाहीये. कारण, हा संपूर्ण कायापालट करण्यासाठी सात लाख रुपये खर्ची घालण्यात आले आहेत (स्कॉर्पिओची मूळ किंमत यात समाविष्ट नाही). त्यामुळे या स्कॉर्पिओचा विचार अनेकजण करुच शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2018 8:51 am

Web Title: stunning modification of mahindra scorpio inspired by ford raptor for just rs 7 lakh see photos
Next Stories
1 जनऔषधी केंद्रात दहा रुपयांत चार सॅनिटरी नॅपकिन
2 रमजानची खाद्यसफर
3 मोटोरोलाचे Moto G6 आणि Moto G6 Play भारतात दाखल
Just Now!
X