ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो गुणकारक ठरतो. कावीळ झालेल्या रोग्यास तर ऊसासारखे दुसरे चांगले औषध नाही. कावीळ झालेल्या रोग्याने एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालू होऊन रूग्ण बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालून घेतल्यास सुध्दा कावीळ बरी होते. याचप्रमाणे, अम्लपित्त वाढललेल्यांनी ऊस खावा किंवा ऊसाचा रस प्यावा त्वरित पोट साफ होते. तसेच ऊस जेवणापूर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.