08 July 2020

News Flash

आला उन्हाळा..अशी घ्या काळजी!

मार्च ते मे या महिन्यांमध्ये कडक ऊन पडायला लागतं

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच चैत्रपालवीची चाहूल लागायला सुरुवात होते. वातावरणातही हळूहळू बदल जाणवायला लागतो. फेब्रुवारीमधील वातावरणातील गारवा कमी होऊ लागतो आणि हवेत उष्णपणा जाणवायला सुरुवात होते. मार्च ते मे या महिन्यांमध्ये कडक ऊन पडायला लागतं. वातावरणातील उष्णता हळूहळू वाढत जाते. त्यामुळे मग प्रचंड घाम येणं, सतत तहान लागणं, घामोळ्या येणं, अंगावर लाल चट्टे उठणं किंवा उन्हामुळे स्कीन टॅन होणं या सारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.

उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

१. चांदीच्या दागिण्यांमुळे शरीरातील उष्णता शोषली जाते. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो चांदीचे दागिने परिधान करावेत. उदा. चांदीचे पैंजण, हातातील वाक्या, अंगठी यासारखे दागिने घालावेत.

२. तांब्यामुळेही शरीरातील उष्णता शोषण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो तांब्याच्या हंड्यातील पाणी प्यावं. तसंच हातात तांब्याची अंगठी आणि कडं परिधान करावं.

३. सुक्यामेव्यातील मनुका खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज रात्री १०० ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यासकट ते मनुके खावेत.

४. अन्नपचन सुरळीत होण्यासाठी आणि शरीरातील दाह कमी करण्यासाठी दही, ताक कधीही उत्तम त्यामुळे जेवणात ताकाचा समावेश हमखास असावा. मात्र ताक रात्रीच्यावेळी पिऊ नये.

५. जिऱ्याचं पाणी प्यावे

६.रात्री काचेच्या भांड्यामध्ये सब्जा भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून रिकाम्यापोटी घ्यावे.

७. जेवणामध्ये भात घेतला तर उष्णतेचे विकार व्हायची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

८. फळांमध्ये कलिंगड,ताडगोळे, द्राक्ष, डाळिंब अशा फळांचा समावेश करावा.

९. पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो त्यामुळे पुदिन्याची चटणी खावी.

१०. जास्तीत जास्त पाणी प्यावे. फ्रिजमधील पाणी न पिता. त्याऐवजी माठातील पाणी प्यावे.

उन्हाचा त्रास जाणवल्यास काय कराल?

१. नाकातून रक्त आल्यास डोक्यावर पाणी मारावे.

२. ज्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो, अशा व्यक्तींनी अंघोळ झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटे ओल्या अंगानेच रहावे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

३. रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपावे. चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो.

४. तेलकट, मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावे.

५. उष्णतेमुळे तोंड आल्यास कच्ची तोंडली खावी. तसंच साजूक तूप लावावे आणि सर्वात महत्त्वाचं पोट स्वच्छ ठेवावं.

६. लघवीला जळजळ होत असल्याचं सब्जा घातलेलं पाणी प्यावं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 1:05 pm

Web Title: summer take care health tips ssj 93
Next Stories
1 Vodafone-Idea युजर्ससाठी ‘बॅड न्यूज’ , एक एप्रिलपासून कॉल-डेटा ७-८ टक्क्यांनी महागणार?
2 Realme चाहत्यांसाठी खूशखबर, सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय
3 Chrome वापरणाऱ्यांना वॉर्निंग, Google कडून तातडीने अपडेट करण्याची सूचना
Just Now!
X