News Flash

उन्हाळयात आजार टाळण्यासाठी करा हे सोपे उपाय

उन्हामुळे अपचन, थकवा जाणवतो. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात.

सध्या सर्वच जण उन्हाच्या काहिलीने हैराण झाले आहेत. अनेक भागांमध्ये तापमान ४० डिग्रींच्या पुढे पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हाळयात नागरीकांना विविध शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हामुळे अपचन, थकवा जाणवतो. त्यामुळे डॉक्टर रुग्णांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळयात असे त्रास होऊ नयेत यासाठी आपण काही गोष्टी जाणून घेऊया.

– बाहेर तापमान जास्त असल्यास शक्य तो उन्हातून प्रवास टाळा. सध्या लॉकडाउन असल्यामुळे कोणीही घराबाहेर पडत नसेल. तरीही काही कामानिमित्त तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर  उन्हापासून बचावासाठी छत्री किंवा रूमाल घेऊन घरा बाहेर पडा. शक्यतो सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत उन्हातून प्रवास टाळा.

– शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आवश्यक असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. हिवाळयाच्या तुलनेत उन्हाळयात शरीराला ५०० मिलीलीटर जास्त पाण्याची आवश्यकता असते.

– लॉकडाउनमध्ये अत्यवशक गोष्टी अथवा रूग्णालयात जाण्यासाठी बाहेर पडताना जास्तीत जास्त शरीर झाकून बाहेर पडा. तुम्हाला उष्म्याचा नेहमीच त्रास होत असेल तर कांदा जवळ बाळगा. टोपी, गॉगल, सनस्क्रीनचा वापर करा.

– उन्हाळयात जड अन्नपदार्थांऐवजी थंड पाणी, लिंबू सरबत, कैरीचे पन्ह, फळांचा रस, ताक, लस्सी यांचे जास्त प्रमाणात सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून रहाते.

– उन्हाळयात व्यायाम करताना सतत घाम येत असल्यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे शरीराला ताण देणाऱ्या व्यायामाऐवजी हलका व्यायाम, योगावर भर द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 4:25 pm

Web Title: summer tips easy ways to beat the heat nck 90
Next Stories
1 MG Motor चा पुढाकार, करोना वॉरियर्सच्या निःशुल्क प्रवासासाठी पुरवणार 100 Hector SUV
2 summer recipe : नारळ, चियाच्या बिया आणि अव्होकाडो पुडिंग
3 BSNL ची भन्नाट ऑफर, मोफत मिळतंय Amazon Prime Subscription
Just Now!
X