News Flash

लिंबाच्या सालीचे फायदे ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या काय आहेत फायदे

लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत.

लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत.

पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर होतो. हे संत्री आणि मोसंबी प्रमाणे एक साइट्रस फळ आहे. नेहमी आपण लिंबाचा रस वापरतो आणि त्याची साल ही फेकुन देतो. मात्र, लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत. लिंबात बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. लिंबाच्या सालीत फायबर आणि क जीवनसत्त मोठ्या प्रमाणात असते. एवढंच नाही तर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतात. एवढे जीवसत्तव असलेल्या लिंबाच्या सालीचे आज आपण फायदे जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी

१. लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. संशोधना नुसार आपण जर रोज एक ते दोन ग्रॅम क जीवनसत्त्वाचे सेवन केले तर आपल्याला व्हायरल ताप आणि सर्दी होण्याची शक्यता ही ८ ट्क्क्यांन कमी होते.

२. अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.

३. कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार

४. चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.

५. फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते.

६. घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.

आणखी वाचा : दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन

७. लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.

८. ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 6:32 pm

Web Title: surprising health and beauty benefits of lemon peel dcp 98
टॅग : Health News,Lifestyle
Next Stories
1 स्तनपान करणाऱ्या मातांनी ‘या’ पदार्थांचं सेवन करणं पूर्णपणे टाळावं
2 मैदा, बेसन आणि पीठाला कीडं लागत असेल तर करा ‘या’ गोष्टी
3 पावसाळ्यात पोटाची घ्या काळजी : जाणून घ्या या काळात पोटातील गडबड टाळण्यासाठी काय करावं
Just Now!
X