13 December 2019

News Flash

अॅलॉय व्हिल्स आणि कॉम्बी ब्रेकिंग, ‘सुझुकी’ची नवीन Access 125 स्कुटर लाँच

अॅक्सेस 125 स्कुटर म्हणजे 125cc क्षमतेच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कुटर्सपैकी एक

Suzuki ने आपली लोकप्रिय स्कुटर Suzuki Access 125 साठी नवं व्हेरिअंट लाँच केलं आहे. अॅलॉय व्हिल्स असलेल्या या नव्या स्कुटरची किंमत 59 हजार 891 रुपये (एक्स-शोरुम) आहे. यासोबत कंपनीने एक विशेष आवृत्तीही लाँच केली असून 61 हजार 590 रुपये (एक्स-शोरुम) इतकी या विशेष आवृत्तीची किंमत आहे.

अॅलॉय व्हिल्स असलेल्या स्कुटर्सला ग्राहकांची वाढती मागणी असल्यामुळे नवीन व्हेरिअंट लाँच करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. नवीन Access 125 पर्ल सुझुकी डीप ब्ल्यू , ग्लास स्पार्कल ब्लॅक, मेटेलिक मॅट फायब्रोइन ग्रे आणि पर्ल मिराज व्हाइट या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

अॅलॉय व्हिल्सशिवाय या स्कुटरमध्ये मॅकेनिकली काहीही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 124cc क्षमतेचं इंजिन असून हे इंजिन 7,000 rpm वर 8.5 bhp ची ऊर्जा आणि 5,000 rpm वर 10.2 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. यामध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिम (CBS), सेंट्रल लॉकिंग आणि युनिक सेफ्टी शटर यांसारखे फीचर्स आहेत. अॅक्सेस 125 च्या नव्या व्हेरिअंटमध्ये सुझुकीची स्टार्ट सिस्टिम, लांब सीट आणि आरामदायक रायडिंग पोझिशनसाठी मोठा फ्लोअर बोर्ड आहे. याशिवाय यामध्ये क्रोम प्लेट फिनिश, स्टायलिश हेडलँप, डिजिटल मीटर, ऑइल चेंज इंडिकेटर आणि ड्युअल ट्रिप मीटर आहेत.

सर्वाधिक विक्री होणारं मॉडल –
अॅक्सेस 125 स्कुटर म्हणजे भारतीय बाजारातील सुझुकीचं सर्वाधिक विक्री होणारं मॉडल आहे. याशिवाय 125cc क्षमतेच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कुटर्सपैकी एक आहे.

First Published on August 13, 2019 5:20 pm

Web Title: suzuki access 125 with alloy wheel variant launched know price and all specifications sas 89
Just Now!
X