सुजुकी मोटारसायकल इंडियाने बुधवारी आपल्या फ्लॅगशिप मोटोक्रॉस बाइक्स, Suzuki RM-Z250 आणि Suzuki RM-Z450 भारतात लॉन्च केल्या आहेत. सुजुकी RM-Z मालिकेतील बाइक्सची जगभरात ऑफ रोड कॅपेबिलिटी आणि उत्तम हॅंडलिंगसाठी खास ओळख आहे.

Suzuki RM-Z250 ची नवी दिल्ली एक्स शोरूम किंमत 7.1 लाख रुपये आणि Suzuki RM-Z450 ची किंमत 8.31 लाख रुपये आहे. मात्र, या दोन्ही बाइक्स केवळ ऑफ रोडिंगसाठी आहेत, म्हणजेच या गाड्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी नाहीये. याचा अर्थ तुम्हाला नेहमीच्या वरदळीच्या रस्त्यांवर या गाड्यांचा वापर करता येणार नाही. यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष खडतर अशा रस्त्यांवरच(ट्रॅक) या गाड्यांचा वापर करता येणार आहे.

(Suzuki-RMZ250)

फिचर्स – 2019 Suzuki RM-Z450 मध्ये 449cc, 4 स्ट्रोक, फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं असून यामध्ये S-HAC म्हणजे सुजुकी होलशॉट असिस्ट कंट्रोल फिचर आहे. यामध्ये ड्रायव्हिंग मोडचे तीन पर्याय असून रस्त्यानुसार त्याचा वापर करता येईल. RM-Z450 पहिली मोटोक्रॉस बाइक आहे, ज्यामध्ये न्यू बॅलेंस फ्री रिअर कुशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे गाडी आदळल्यानंतरही बसणाऱ्याला जास्त त्रास जाणवणार नाही. RM-Z450 चं वजन 112 किलोग्राम आहे, आणि 330 एमएमचं ग्राउंड क्लिअरंस आहे. पुढील टायर 21 इंच आणि मागील टायर 18 इंचाचा आहे.

Suzuki RM-Z250 में 249 cc, 4 स्ट्रोक, फ्युअल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. अॅल्युमिनियम रिम्स या बाइकमध्ये असून मोटोक्रॉस कंडिशन आणि ऑफ रोड रायडिंगच्या दृष्टीकोनातून ही बाइक तयार करण्यात आली आहे. Suzuki RM-Z250 चं कर्ब वेट 106 किलोग्राम आणि 345 mm ग्राउंड क्लिअरंस आहे.