उत्तम आरोग्य हवं असेल तर प्रत्येक प्रकारची भाजी ही खाल्लीच पाहिजे. पालेभाज्यांपासून ते कंदमुळांपर्यंत अशा अनेक भाज्या आहेत ज्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. यात पालेभाज्या, कडधान्य हे आपण बऱ्याच वेळा खातो. मात्र कंदमुळांकडे अनेक वेळा पाठ फिरवली जाते. त्यातल्या त्यात बटाटा आणि बीट ही दोन कंदमुळे आपल्या आहारात जास्त प्रमाणात खाल्ली जातात. मात्र रताळी या कंदमुळाकडे अनेक वेळा दुर्लक्ष होतं. परंतु रताळी हे अत्यंत गुणकारी असून त्याचे अनेक फायदेही आहेत. त्यामुळे रताळी केवळ उपवासाच्याच दिवशी न खाता त्याचे विविध पदार्थ तयार करुन रोजच्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात रताळ्याचं सलाड करण्याची पद्धत.

साहित्य-
२५० ग्रॅम रताळी, ६० मिली ऑलिव्ह ऑइल, १ चमचा लिंबूरस, १ चमचा मध, काळीमिरी पावडर चवीनुसार, ५० ग्रॅम बारीक चिरलेला कोबी, १ लहान कांदा, २० ग्रॅम बेदाणे.
कृती-

आधी रताळी स्वच्छ धुऊन उकडून घ्या. मग त्याचे पातळ काप करा. एका पॅनमध्ये रताळ्याचे काप ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून घ्या. त्यातच चिरलेला कांदा परतून घ्या. त्याच पॅनमध्ये बारीक चिरलेला कोबी घाला. या तिन्ही गोष्टी खरपूस परतून घ्या. नंतर मीठ मिरपूड घालून चव पाहा. हे सलाड खायला देईपर्यंत थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. खायला देताना आपल्याला त्यावर ड्रेसिंग घालून द्यायचे आहे. या ड्रेसिंगसाठी एका बाऊलमध्ये थोडे तेल, लिंबाचा रस आणि मध एकत्र करा. चवीनुसार मिरपूड घाला. आता रताळ्याच्या मिश्रणावर हे ड्रेसिंग घालून खा. वर कोथिंबिरही भुरभुरा. हे

पोषणमूल्ये
कॅलरी – १३८
प्रोटीन – २ ग्रॅम
फॅट – ५ ग्रॅम
कार्ब्स – २४ ग्रॅम

nilesh@chefneel.com