News Flash

करोनावर मात केलेल्यांमध्ये आढळतायत जटिल आजाराची लक्षणं – हिंदुजा हॉस्पिटल

रूग्‍णांमध्‍ये सुरूवातीला आजारामधून बरे झाल्‍यानंतर चार ते सहा आठवड्यांपर्यंत आजाराची लक्षणे आढळून येतात.

covid19 patient
म्‍युकरमायकोसिच्‍या केसेसमध्‍ये वाढ होताना निदर्शनास येत आहे.

अनेक रूग्‍ण आता कोरोना आजारामधून बरे होत आहे. परंतु बरे झाल्‍यानंतरच्‍या काही आठवड्यांमध्‍ये कोविडनंतरची जटिल लक्षणे आढळून येत असल्‍याबाबत तक्रार करत आहेत. या लक्षणांची नोंद ‘लाँग कोविड’ म्‍हणून केली जात आहे. रूग्‍णांमध्‍ये सुरूवातीला आजारामधून बरे झाल्‍यानंतर चार ते सहा आठवड्यांपर्यंत आजाराची लक्षणे आढळून येतात. आणि फुफ्फुसे, मूत्रपिंड, हृदयविषयक सारखे आजार होण्‍यासोबत ‘काळी बुरशी’ म्‍हणून प्रचलित असलेल्‍या म्‍युकरमायकोसिच्‍या केसेसमध्‍ये देखील वाढ होताना निदर्शनास येत आहे.

पहिल्‍यांदाच वैद्यकीय क्षेत्रामध्ये पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अॅण्‍ड एमआरसी, मुंबई येथील प्रोफेशनल सर्विसेसचे संचालक, ऑर्थोपेडिक्स अॅण्‍ड ट्रॉमॅटोलॉजीचे प्रमुख डॉ. संजय अगरवाला आणि डॉ. मयंक विजयवर्गिया यांनी रूग्‍णांवर यशस्वी उपचार केले. त्यांनी नितंबावर परिणाम करणारी वेदनादायी विकलांग झाल्‍यासारखे भासवणारी स्थिती अव्‍हॅस्‍कुलर नेक्रोसिस (एव्‍हीएन) किंवा ऑस्‍टेओनेक्रोसिसने पीडित कोविड-१९ रूग्‍णांना बरे केले आहे. डॉक्‍टरांनी यावर वैद्यकीय अहवाल लिहिला आहे आणि ब्रिटीश मेडिकल जर्नल (बीएमजे) केस रिपोर्टसने या अहवालाच्‍या प्रकाशनासाठी मान्‍यता दिली आहे.

लवकर निदान झाल्यास उपचार करणे शक्य

कोविड आजारामधून बरे झाल्‍यानंतर स्टिरॉईड्स उपचार घेण्‍यासोबत नितंब किंवा मांडीमध्‍ये वेदना निर्माण झालेल्‍या रूग्‍णांना नितंबाच्‍या एव्‍हीएन (ऑस्‍टेओनेक्रोसिस) निदानासाठी एमआरआय करणे आवश्‍यक आहे असे डॉक्टर सांगतात. त्‍यानंतरच या आजारावर यशस्‍वीरित्‍या उपचार करता येऊ शकतो असे ते म्हणतात. लवकर निदान झाल्‍यास लवकर उपचार सुरू करणे शक्‍य होऊ शकते.

एव्‍हीएनवर व्‍यापक संशोधन

एव्‍हीएनच्‍या उपचारासाठी प्रख्‍यात असलेले डॉ. संजय अगरवाला यांनी एव्‍हीएनवर व्‍यापक संशोधन केले आहे. तसेच  २० वर्षांपासून सहका-यांनी अवलोकन केलेल्‍या इंटनरॅशनल जर्नल्‍समध्‍ये विविध लेख प्रकाशित केले आहेत. त्‍यांच्‍या मते, एव्‍हीएनच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये असलेल्‍या रूग्‍णांवर कोणत्‍याही शस्‍त्रक्रियेशिवाय बायफॉस्‍फोनेट थेरपीसह यशस्‍वीरित्‍या वैद्यकीय उपचार करता येऊ शकतो. आणि शस्‍त्रक्रिया टाळता येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2021 1:11 pm

Web Title: symptoms of a complex disease are found in those who have overcome the corona ttg 97
Next Stories
1 “माझ्यासाठी यश म्हणजे आरोग्य आणि आनंद..”; मिलिंद सोमणने शेअर केला भाषणाचा व्हिडीओ
2 घरच्या घरी निरोगी त्वचेसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
3 तुमच्या पाळीव कुत्र्यांना चुकूनही खायला देऊ नकात ‘हे’ पदार्थ!
Just Now!
X