डॉ. अपर्णा गोविल भास्कर

गेल्या अनेक वर्षांपासून लठ्ठपणा ही एक समस्या होऊ लागली आहे. त्यातच आता लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण घरात राहून बसून काम करत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली आहे. सकाळचा मॉर्गिक वॉकही बंद झाला आहे. या नियमित कामाच्या वेळापत्रकात बिघाड झाल्याने लठ्ठपणाची समस्या अधिकच वाढू लागली आहे. या लठ्ठपणामुळे केवळ आपल्या शरीरयष्टीवरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलन झाल्याने महिलांच्या प्रजननक्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

अनेक महिला सध्या पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळे हे पीसीओएस म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात. पीसीओएस एक हार्मोनल समस्या आहे. यात महिलांच्या शरीरात पुरूष हार्मोनची पातळी वाढते. अशा स्थितीत गर्भधारणेवर परिणाम होतो. परिणामी भविष्यात वंधत्वाच्या समस्येलाही तोंड दयावे लागू शकत. प्रजननक्षमतेवर परिणाम होण्याची अनेक कारणे आहेत. यातील एक मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. शरीरातील चरबीमुळे बीजफलनाची शक्यता कमी होते. त्यामुळे लठ्ठ स्त्रियांना गर्भधारणा होत नसल्यास अतिरिक्त वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. शरीराचे वजन आणि अतिरिक्त चरबी किंवा मेद वितरण या गोष्टींचा परिणाम गर्भधारणेवर होत असतो.

पीसीओएसशी संबंधित काही सामान्य लक्षणे

१.मासिक पाळीतील अनियमितता
२. मुरुम
३. शरीरावरील केसांची वाढ
४. वंध्यत्व
५. टाळूचे केस बारीक होणे

पीसीओएस ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. ज्यामुळे इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पीसीओएस आणि लठ्ठपणा याचा एकमेकांशी काय संबंध आहे हे समजू शकलेलं नाही. परंतु, या दोन्ही समस्यांनी त्रस्त असणाऱ्या महिलांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो.

विशेषतः पीसीओएस आजार असल्याचे निदान झाल्यास त्यावर योग्य ते उपचार करता येऊ शकतात. यामुळे ज्या महिला पीसीओएसने पीडित आहेत किंवा पीसीओएसची लक्षणे दर्शवितात अशा स्त्रियांनी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

वजन कमी होणे पीसीओएसच्या उपचार योजनेचा अविभाज्य भाग आहे. परंतु, हे समजणे महत्वाचे आहे की पीसीओएस ग्रस्त व्यक्तीचे वजन कमी करणे अधिक कठीण आहे. म्हणूनच वजन कमी करण्याच्या तज्ञांच्या मदतीची आवश्यकता असू शकते. कृपया स्वत: ची औषधोपचार करु नका किंवा इंटरनेटवर आधारित वजन कमी करण्याच्या कार्यक्रमात अडकण्याच्या जाळ्यात अडकू नका. शेवटी, आपण केवळ आपले शरीर किंवा तिची प्रतिमा नाही. आपण आपल्या शरीरासाठी आपल्यासाठी करत असलेल्या सर्व गोष्टींचा आपण आदर केला पाहिजे आणि आपण त्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
(लेखिका डॉ. अपर्णा गोविल भास्कर या मुंबईतील अपोलो रुग्णालयात बॅरिअँटिक अँण्ड लेप्रोस्कोपिक सर्जन आहेत.)