News Flash

‘टी-सीरिज’ने मित्रों-MX प्लेयरसारख्या अनेक सोशल मीडिया अ‍ॅप्सना पाठवली नोटीस, कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप

शॉर्ट-व्हिडिओ अ‍ॅप 'रोपोसो'विरोधात खटला दाखल

म्युझिक कंपनी टी-सीरिजने बोलो इंड्या(Bolo Indya) मित्रों (Mitron), MX प्लेयरच्या टकाटक, (TakaTak) ट्रिलर (Triller) आणि जोश (Josh)यांच्यासह अन्य अनेक सोशल व्हिडिओ अ‍ॅप्सना कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.

आपल्या कॉंटेंटचा वापर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केल्याप्रकरणी टी-सीरीजने या अ‍ॅप्सना इशाराही दिला आहे. सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडने या टी-सीरिज ब्रँडमधील कंपनीने या  अ‍ॅप्सकडे जवळपास 3.5 कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. कंपनीने चीनच्या Snack Video या अ‍ॅपलाही नोटीस पाठवली आहे. हे अ‍ॅप अद्याप भारतात बॅन करण्यात आलेलं नाही. याशिवाय कंपनीने शॉर्ट-व्हिडिओ अ‍ॅप रोपोसोविरोधात खटलाही दाखल केला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

टी-सीरीजने नियुक्त केलेल्या इरा लॉ फर्मने या अ‍ॅप्सना नोटीस पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. इरा लॉचे भागीदार गीतांजली विश्वनाथन यांनी, “आघाडीच्या व्हिडिओ अ‍ॅप्सना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे आणि रोपोसोविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती दिली.  तर, “चिनी अ‍ॅप्स बॅन झाल्यापासून आमच्या प्लॅटफॉर्मवर अनेक युजर्सनी बॅन झालेल्या अ‍ॅपवरील व्हिडिओ अपलोड करायला सुरूवात केली आहे. हे व्हिडिओ आमच्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आलेले नाहीत, अशा व्हिडिओंबाबत माहिती मिळताच ते तातडीने हटवण्यात येत आहेत. संगीत कॉपीराइट उल्लंघनाचा कोणताही आधार नाहीये”, असं बोलो इंड्याचे फाउंडर वरुण सक्सेना म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 10:03 am

Web Title: t series issues legal notices to video sharing platforms like roposo mx players takatak for copyright infringement sas 89
Next Stories
1 PUBG Mobile खेळण्यासाठी 15 वर्षांच्या नातवाने आजोबांचं पेन्शन अकाउंट केलं रिकामं, उडवले 2.34 लाख रुपये
2 स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी; टाटा मोटर्सच्या ‘या’ गाड्यांवर मिळतेय ६५ हजारांपर्यंतची सूट
3 चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यापासून ते नैराश्य दूर करेपर्यंत; चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे
Just Now!
X