News Flash

टॅको बेल मॅक्सिकन रेस्तराँचं पुणेकरांसाठी पहिलं आउटलेट

पुणेकरांसाठी घेता येणार चांगल्या मॅक्सिकन फूडचा आनंद

टॅको बेल या मेक्सिकन फूडसाठी प्रसिद्ध असलेल्या जगातील आघाडीच्या रेस्तराँ ब्रँडने पुण्यातील ग्राहकांसाठी आपले दरवाजे खुले केले आहेत. शहरातील प्रसिद्ध सीझन मॉल या नव्या आऊटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. प्रशस्त जागेत असलेल्या या रेस्तराँमध्ये ९५ ग्राहकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. हे आऊटलेट आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत खुले असेल.

टॅको बेलचे भारतातील फ्रँचायजी पार्टनर बर्मन हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड आहेत. या नव्या प्रकल्पाबाबत सांगतना कंपनीचे संचालक गौरव बर्मन म्हणाले, “टॅको बेलचा भारतात अधिक विस्तार करताना आणि पुण्यातील पहिले आऊटलेट सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. टॅको बेल हे जगातील सर्वात प्रसिद्ध क्विक सर्विस रेस्तराँ ब्रँडमध्ये गणले जाते आणि त्यांचे खास पदार्थ, रेस्तराँमधील अप्रतिम वातावरण व सुयोग्य किंमती यामुळे शहरातील ग्राहकांचे पोट भरेलच त्याचबरोबर मनही तृप्त होईल. हे नवे आऊटलेट म्हणजे टॅको बेलच्या भारतातील यशोगाथेतील नवे प्रकरण आहे. आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाची, अप्रतिम चवीची आणि योग्य मूल्य असलेली उत्पादने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न, हेच आमचे ध्येय आहे. देशभरातील इतर ठिकाणी ज्याप्रमाणे टॅको बेलचे स्वागत झाले, त्याचप्रमाणे पुण्यातही आम्हाला प्रेम मिळेल अशी आशा बर्मन यांनी व्यक्त केली.

टॅको बेलमध्ये ऑर्डरप्रमाणे आणि कस्टमाइज्ड टॅकोज व ब्युरिटोजसोबतच वेगळी चव, दर्जेदार घटक, स्पर्धात्मक किंमत आणि सर्वोत्कृष्ट ग्राहकसेवांसह इतर अनेक चविष्ट पदार्थ उपलब्ध आहेत. त्यांच्या व्यापक मेनूमध्ये सिग्नेचर व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन पदार्थ आहेत. तसेच यामध्ये जसेनेकेड चिकन टॅको, चिकस्टार रॅप, लोडेड चिजी चॉलपस, चीज कॅसडीला, ७ लेअर बुरिटो तसेच प्रसिद्ध चोकोडिलासारखे डेझर्टस याठिकाणी ग्राहकांना चाखायला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 5:49 pm

Web Title: taco bell first restaurant launch in pune seasons mall
Next Stories
1 शाओमीला टक्कर देण्यासाठी येतोय सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा फोन
2 BSNL चा त्सुनामी प्लॅन, 98 रुपयात 2GB हाय-स्पीड डेटा
3 महिंद्राच्या ‘स्कॉर्पिओ’, ‘माराझो’वर आकर्षक डिस्काउंट
Just Now!
X