21 October 2020

News Flash

पावसाळ्यात पाणी पिताना अशी घ्या काळजी…

पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, डायरिया असे आजार उद्भवतात

दूषित पाण्यातून पावसाळ्यात आणि एरवीही अनेक आजार पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, कॉलरा, डायरिया असे आजार उद्भवतात. या आजारांपासून लांब राहण्यासाठी पाणी र्निजंतूक व स्वच्छ असणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध नसते त्यांच्यासाठी तर हे उपाय जास्तच फायदेशीर ठरतात. तेव्हा घरच्या घरी पाणी स्वच्छ करण्याच्या काही खास पद्धती…

१. पाणी गाळून घेणे – वॉटर प्युरीफायरमध्ये पाणी गाळले जाते. त्याचप्रमाणे स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीची गाळणी यांनी पाणी गाळून घेतल्यास ते स्वच्छ होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या पद्धतीचा हमखास वापर करावा. मी चागंल्या सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे आमच्याकडे चांगले पाणी येते असे वाटत असले तरीही पाणी कायम गाळून मगच प्यावे.

२. उकळणे – पाण्याच्या दोन प्रकारच्या दुष्टीपासून आपण आपली काळजी घेतली पाहिजे. भौतिकदृष्टय़ा पाणी दुष्ट होते ते म्हणजे कचरा, माती, गाळ इत्यादी आणि जीव-जंतूंनी पाणी दुष्ट होते. हा अतिशय धोकादायक प्रकार. भौतिक दुष्टी आपण पाणी गाळून, तुरटी फिरवून घालवू शकतो, पण जीव-जंतूंच्या दुष्टीमध्ये पाणी उकळून घेणे जास्त सोयीस्कर आहे. उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे.
(पाण्याला उकळी फुटल्यानंतर पाणी १०-१५ मिनिटे उकळावे. नंतरच गॅस बंद करावा. पाणी पुरेसे उकळणे गरजेचे आहे.)

३. तुरटी फिरवणे – तुरटी फिरवून पाणी शुद्ध करणे ही अतिशय पारंपरिक पद्धत आहे. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होते. मात्र तुरटी फिरवली असली तरीही हा पाणी स्वच्छ करण्याचा म्हणावा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने हे पाणी गाळून आणि उकळूनच प्यावे.

४. नळाला फडके किंवा फिल्टर बसविणे – पावसाळ्याच्या दिवसात नळाला काहीसे मातकट आणि अशुद्ध पाणी येते. त्यामुळे हे पाणी भरतानाच काही प्रमाणात स्वच्छ व्हावे यासाठी नळाला कापड बांधावे किंवा गाळणे लावावे. याशिवाय हल्ली बाजारात नळाला लावण्यात येणारी वेगवेगळी फिल्टर्स उपलब्ध असतात. त्यांचा वापरही फायदेशीर ठरु शकतो. यामुळे पाण्यातील सौम्य प्रकारच्या जंतूंचा धोका कमी होण्यास मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 2:04 pm

Web Title: take care of drinking water in monsoon nck 90
Next Stories
1 11 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन!
2 किंमत पाच लाखांहून कमी, कशी आहे ‘ही’ सात आसनी ‘कॉम्पॅक्ट एमपीव्ही’?
3 96 रुपयांत दररोज 10जीबी 4जी डेटा, BSNLचा शानदार प्लान
Just Now!
X