17 November 2017

News Flash

औषध एक्सपायर होणं म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

औषधे ही त्यावरील सूचनांनुसारच साठवली जायला हवीत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 1:10 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

अरे, ते औषध मेडिकलवाल्याला देऊन टाक. ते एक्सपायर म्हणजेच मुदतबाह्य झालं आहे, असे आपले घरचे आपल्याला सांगतात. पण औषध एक्सपायर होतं म्हणजे नक्की काय होतं हेच आपल्याला कळत नाही. काहींना असं वाटतं औषध एक्सपायर झालं म्हणजे त्यात विष तयार झालं आहे. तर औषध एक्सपायर होतं म्हणजे त्याच्या लेबलवर त्या औषधाची जी Strength लिहिलेली असते, (उदा. अमुक एका गोळीवर लिहिलेले असते Each Tablet Contains Paracetamol 500 mg, तर 500 mg ही झाली या औषधाची Strength) ती ज्या दिवशी १० टक्क्यांनी कमी होते ती झाली त्या औषधाची एक्सपायरी डेट!

एक्सपायरी डेट (Expiry Date ) साठी वापरला जाणारे शास्त्रीय नाव आहे t-९०%. यातला t म्हणजे Time. औषध जेव्हा ९०% उरते (म्हणजेच १० टक्क्यांनी कमी होते) तो वेळ म्हणजेच एक्सपायरी डेट. म्हणजेच एक्सपायरी डेट जेव्हा उजाडते तेव्हा त्यावर दिलेल्या डोसपेक्षा औषधाची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे त्याचा परिणाम थोडाफार कमी होतो, तो शून्य होतो असे अजिबात नव्हे.

ऑफिसमधल्या तणावाला कंटाळलात? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा

औषधाची Strength १० टक्क्यांनी कमी होते. पण म्हणजे नक्की काय होतं? ५०० मिलीग्रॅमऐवजी हे प्रमाण ४५० मिलीग्रॅम होऊ शकतं. तर औषध हे एक रसायन आहे आणि काळानुसार ते हळू-हळू रासायनिक क्रियेमुळे त्याचा प्रभाव कमी होतो. सगळी औषधे ही एक्सपायरीनंतर हानिकारक नसतात तर काही विशिष्ट औषधेच एक्सपायरीनंतर हानिकारक ठरु शकतात. हवेतील ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन होऊन किंवा हायड्रोजनमुळे रिडक्शन होऊन किंवा सूर्यप्रकाशामुळे किंवा इतर असंख्य रासायनिक क्रियामुळे हे औषध हानिकारक होते.

एका औषधाचे वेगवेगळ्या मार्गाने दर्जा कमी होऊ शकतो आणि त्यामुळे एकाच वेळी त्याची वेगवेगळी उत्पादने (Reaction Products ) बनू शकतात. ही उत्पादने निरुपद्रवी असतील तर त्याचा परिणाम इतकाच होतो कि औषधाची Strength कमी होते. पण कधी-कधी मात्र ही उत्पादने अपायकारकही असू शकतात. एक्सपायरी डेटनंतरचा असा अभ्यास मात्र कंपनीने केलेला नसतो.

चालण्याचा व्यायाम ‘या’ गोष्टींसाठी फायदेशीर

जर औषधावर लिहिलेली एक्सपायरी डेट २ वर्षे आहे. तर मग जो अभ्यास केला जातो तो या २ वर्षांचाच असतो. पण समजा हे औषध 2-3 वेगवेगळ्या Degradation Pathways ने त्याचा दर्जा कमी होते आहे, ज्यातला एक Pathway अत्यंत संथ आहे, त्याचे Reaction Product ४ वर्षानंतर बनतेय आणि ते अपायकारक आहे आणि असे औषध जर कुणी एक्सपायरी डेटनंतर घेतले तर अपाय होऊ शकतो.

औषधे ही त्यावर दिलेल्या सूचनांनुसार साठवली जायला हवीत. बहुतांश औषधे थंड आणि कोरड्या जागी ठेवायची असतात. त्यामुळे औषधावरील सूचना लक्षपूर्वक पाळली जायला हवी.

First Published on July 17, 2017 1:10 pm

Web Title: take care of expiry date of medicine storage