16 December 2017

News Flash

कार सर्व्हिसिंगला देताय? मग ‘या’ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

दुर्लक्ष ठरु शकते घातक

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 10, 2017 11:30 AM

आपण वापरत असलेली दुचाकी किंवा चारचाकी वेळच्यावेळी सर्व्हिसिंगला देणे अतिशय गरजेचे असते. गाडीची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास तीचे आयुष्य चांगले तर राहतेच पण ते वाढण्यासही मदत होते. काहीवेळा गाडी आपल्याला छोटामोठा त्रास देत असते. मात्र त्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर पाहू म्हणून ते काम पुढे ढकलतो. मात्र अशाने गाडी लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी वेळच्यावेळी सर्व्हीसिंगला द्या. तसेच गाडी सर्व्हिसिंगला देताना कोणती काळजी घ्याल याविषयी…

१. सर्व्हिस सेंटर अधिकृत असावे

अनेकदा गाडी सर्व्हीसिंगला देताना आपण पैशांचा विचार करतो. मोठ्या आणि अधिकृत सर्व्हिस सेंटरला सर्व्हिसिंगसाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे अनेकदा आपण गाडी स्थानिक सेंटरमध्ये सर्व्हिसिंग कऱण्याचा विचार करतो. मात्र चांगल्या आणि अधिकृत सर्व्हिस सेंटरला गाडी सर्व्हिसिंगला देणे केव्हाही फायदेशीर असते. याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्यान आलेल्या तंत्रत्रानाविषयी योग्य ती माहिती असते याशिवाय अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये गाड्यांचे कोणतेही भाग आणि उपकरणे यांची कमी नसते. त्यामुळे गाडी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये देणे केव्हाही चांगले.

२. बनावट भाग लावण्यापासून बचाव

स्थानिक सर्व्हिसिंग सेटरमध्ये गाडी दिल्यास याठिकाणी गाडीची दुरुस्ती करत असताना त्याला बनावट भाग लावण्याची शक्यता असते. यामुळे गाडी खराब होऊ शकते. त्यामुळे पुन्हा पुन्हा खर्च उद्भवू नये यासाठी कंपनीचे सर्व्हिसिंग सेंटर असल्यास जास्त चांगले.

३. सर्व्हिसिंग करताना त्याठिकाणी उपस्थित राहा

गाडी सर्व्हिसिंगला दिल्यानंतर आपल्याला त्याठिकाणी उपस्थित राहणे शक्य नसते. अनेकदा वर्कींग डेच्या दिवशी आपण सकाळी गाडी देतो आणि ऑफीसला जातो. अशावेळी आपल्याला थांबणे शक्य नसेल तरी कोणालातरी गाडीपाशी थांबायला सांगावे. त्यामुळे गाडीचे नेमके कशापद्धतीने सर्व्हिसिंग केले जाते. कोणते भाग बदलले जातात हे आपल्याला समजते. गरज असेल तितक्याच गोष्टी सर्व्हिसिंगच्या वेळी करुन घ्याव्यात. अन्यथा सर्व्हिसिंग करणाऱ्यांनी सांगितले म्हणून जास्तीची कामे करुन घेणे टाळा.

First Published on August 10, 2017 11:30 am

Web Title: take care of this things while you give your car for servicing important tips