26 February 2021

News Flash

सनबाथ घेणा-या महिलांच्या आयुर्मानात वाढ!

नियमित सनबाथ घेणाऱ्या महिलांच्या आयुर्मानात वाढ होऊन त्या इतरांपेक्षा अधिक जगत असल्याचे एका अभ्यासाद्वारे पुढे आले आहे.

| September 22, 2013 02:41 am

परदेशातील समुद्रकिनाऱ्याचे चित्र पाहिले की अनेक महिला सनबाथ घेताना दिसतात. आपल्याकडे या प्रकाराकडे थोड्या विचित्र पद्धतीने पाहिले जात असले तरी अशा प्रकारे नियमित सनबाथ घेणाऱ्या महिलांच्या आयुर्मानात वाढ होऊन त्या इतरांपेक्षा अधिक जगत असल्याचे एका अभ्यासाद्वारे पुढे आले आहे. सनबाथ हा प्रकार केवळ टाइमपास म्हणून न घेतात त्याचे वैद्यकीय उपयोग ही शास्त्रज्ञांनी समोर आणले आहेत. जीवनसत्व ड शरीरातील रक्ताच्या गाठी, मधुमेह आणि काही ट्यूमरला प्रतिबंध करत असल्याचा दावा स्विडनमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच, सनबाथमुळे त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करता येत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
रक्ताच्या गाठीमुळे दरवर्षी जगात अनेकांचा मृत्यू होतो. शास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनामुळे समुद्रकिनारी स्वस्त पडून राहणे ही केवळ मजे पुरती गोष्ट न राहता. ती आरोग्यासाठी ही फायद्याची ठरणार आहे. भारतात गोव्याचे काही समुद्रकिनारे वगळता, सनबाथ हा प्रकार अन्य ठिकाणी दिसत नसला तरी या संशोधनामुळे आरोग्यादायी सनबाथचे प्रमाण वाढले तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 2:41 am

Web Title: taking a sunbath makes women live longer
टॅग : Lifestyle News
Next Stories
1 एड्सवर मारक ठरणा-या लसीचा शोध
2 सिगारेट सोडा; झोप वाढवा!
3 लाल द्राक्षे आणि ब्ल्यूबेरींमुळे होते रोग प्रतिकारशक्तीत वाढ!
Just Now!
X