06 March 2021

News Flash

हिवाळ्यात सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी..

थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात.

थंडीमध्ये बहुतेक ज्येष्ठांना सांधेदुखीची तक्रार जाणवते.

तापमान जसजसं कमी होतं, तसं काही लोकांमध्ये हाडांशी निगडीत समस्या वाढतात. थंडीमध्ये बहुतेक ज्येष्ठांना सांधेदुखीची तक्रार जाणवते. थंडीत मुख्यत्वेकरून सांध्यांचे जुनाट आजार, त्वचेच्या समस्या त्याचप्रमाणे फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या तोंड वर काढतात. नेहमी दुखत असलेल्या शरिराच्या एखाद्या अवयवाचं दुखणं थंडीत असह्य होतं. थंडीत उद्भवणाऱ्या अशाच काही समस्यांचा आणि त्यांवरच्या उपायांचा परामर्श आपण आज घेणार आहोत.

लक्षणे-

पायऱ्या चढउतार करताना किंवा उठता-बसताना त्रास होणे
थोडासा अधिक दाब पडल्यानंतर सांध्याच्या भागात सूज येणे
हाडांमधून आवाज येणे
पाण्यात अधिक काम केल्यास त्रास होणे
हाडे दुखणे वा ठसठसत राहणे
पाठ, पायांची हाडे, हातांच्या हाडांमध्ये होणाऱ्या वेदना अधिक वाढणे

कारणे-

बदलती जीवनशैली, व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या योग्य सवयींचा अभाव यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढतात. सांधेदुखी आनुवंशिकही असू शकते. त्यासाठी काही आरोग्यपूर्ण गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. या गोष्टी पाळल्या, तर हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.

उपाय-

हिवाळ्यात ऊन कमी असते. त्यामुळे उन्हात बसायला हवे. त्याने हाडांना पोषण मिळते.
थंड पाण्यात काम करणे टाळा. पायात कायम घरात वापरायच्या चपला घाला.
हिवाळ्यात आहारावर लक्ष ठेवावे. शिळे अन्न खाऊ नये. आहारात फळे, पालेभाज्या, डाळी, कडधान्य आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा.
वजन वाढणाऱ्या पदार्थांना या दिवसात दूर ठेवावे. तसेच आहारात ड आणि क जीवनसत्त्व देणाऱ्या पदार्थांचा वापर करावा.
हिवाळ्यात भूक जास्त लागते. मधल्या वेळी पौष्टिक लाडू, सूप, उपमा, एखादे फळ किंवा खजूर असा पौष्टिक आहार घ्यावा.
हातापायात मोजे वापरावे.
सायकल चालवणे, पोहणे, चालण्यासारखे व्यायाम करणेसुद्धा गरजेचे आहे. व्यायामामुळे सांध्यांना लवचिकपणा, गतिशीलता आणि स्नायूंना शक्ती मिळते.
गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपल्या वजनावर लक्ष केंद्रीत करावे. अधिक आहार घेतल्याने त्यांचे वजन वाढू लागते व त्याचा ताण गुडघ्यांवर येऊन वेदना वाढतात.
रात्री झोपण्यापूवी दोन्ही पाय गरम पाण्यात ठेवावे व नंतर तिळाच्या तेलाने मालिश करून मोजे घालून झोपावे.
या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करावी. मात्र, अतिगरम पाणी टाळावे.

– डॉ. किरण एम लडकत, ऑर्थोपेडिक आणि हँड सर्जन सल्लागार, जसलोक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 5:06 pm

Web Title: taking precautions of joint pain and bone health this winter season
Next Stories
1 कृत्रिम प्रकाश आरोग्याला घातकच
2 बाळाच्या स्किनकेअरबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
3 श्री दत्त विशेष : आडवाटेवरची दत्तस्थाने
Just Now!
X