19 January 2021

News Flash

मनोमनी : नैराश्यावर बोलू या!

सध्या करोना विषाणू आणि त्याच्याशी निगडित समस्यांमुळे सगळीकडेच तणावाचे वातावरण आहे.

अशा तणावपूर्ण परिस्थितीमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे. यातूनच बहुतांश लोक नैराश्याच्या आजाराला बळी पडत आहेत.

डॉ.अमोल देशमुख

सध्या करोना विषाणू आणि त्याच्याशी निगडित समस्यांमुळे सगळीकडेच तणावाचे वातावरण आहे. अशा तणावपूर्ण परिस्थितीमुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होत आहे. यातूनच बहुतांश लोक नैराश्याच्या आजाराला बळी पडत आहेत. ‘नैराश्य- चला बोलू या’, जागतिक आरोग्य संघटनेचे २०१७ चे ब्रीदवाक्य. जगभरात २६४ दशलक्ष लोक नैराश्याच्या आजाराने ग्रस्त होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी जवळपास आठ लाख लोक नैराश्यात जाऊन आत्महत्या करतात. भारतात ५७ दशलक्ष लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. तरुणांमध्ये हा आजार जास्त फोफावत चालला आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आहे. नैराश्याने व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि देशाच्या प्रगतीत हा मोठा अडथळा आहे. नैराश्य काय आहे हे समजून घेणे, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांबाबत माहिती करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

सतत उदास वाटणे म्हणजे नैराश्य. हा एक मानसिक आजार आहे, ज्यामध्ये व्यक्तीला दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी उदास वाटणे, थकवा जाणवणे, उत्साह कमी होणे, नकारात्मक विचार, एकाग्रतेचा अभाव, आत्महत्येचे विचार येणे, आत्मविश्वास ढासळणे, कमीपणाची भावना, झोप आणि भूक कमी/ जास्त प्रमाणात येत असेल तर कठळएफठअळकडठअछ उछअररकाकउअळकडठ डा ऊकरएअरएर (कउऊ10) प्रमाणे हा नैराश्याचा (ऊएढफएररकडठ) आजार होय. लक्षणांच्या स्वरूपानुसार नैराश्याचे सौम्य, मध्यम आणि तीव्र असे तीन प्रकार आहेत.

नैराश्यामागे जैविक, मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे आहेत. मेंदूमधील मुख्यत: सिरोटोनिन (री१३ल्ल्रल्ल) तसेच इतर काही रसायनांचा असमतोल, आनुवंशिकता, लहान वयातील मानसिक आघात, स्थलांतर, अपघात, औद्योगिकीकरण, आधुनिकीकरण, अप्रभावी पालकत्व, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, कौटुंबिक वाद, कर्ज ही महत्त्वाची कारणे आहेत. बऱ्याचदा बा कारणे नसतानाही नैराश्य येऊ  शकते, ज्याचे मुख्य कारण मेंदूमधील रासायनिक बदल (२ी१३ल्ल्रल्ल) असतात, त्यास जैविक नैराश्य म्हणतात.

प्रौढांमध्ये प्रमाण सर्वात जास्त आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त आढळते. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अगदी कोणालाही नैराश्य येऊ  शकते. नैराश्यामध्ये व्यक्तीच्या सर्वागीण आयुष्यावर परिणाम होतात. त्याची कार्यक्षमता कमी होऊन उत्पादनक्षमता कमी होते. नैराश्य तीव्र होत गेल्यास आत्महत्येच्या प्रवृत्ती वाढतात. नैराश्य हे आत्महत्येचे प्रमुख कारण आहे. नैराश्याने ग्रस्त लोकांमध्ये अपचन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार होण्याचे प्रमाण जास्त असते. नैराश्यामुळे नात्यावर परिणाम होतात.

नैराश्य आजारासाठी मेंदूतील रासायनिक बदल संतुलित करण्यासाठी औषधोपचार  गरजेचा आहे. काही तीव्र नैराश्याच्या रुग्णांना विद्युत उपचार पद्धती परिणामकारक ठरते. समुपदेशन म्हणजेच सायकोथेरपी आजाराच्या विशिष्ट टप्प्यात प्रभावी ठरते. यासोबतच संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणाव नियमन पद्धती, आपापसांत सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे.

एकंदरीतच मानसिक आजारांविषयी असलेल्या गैरसमजांमुळे बहुतांश नैराश्यग्रस्त व्यक्ती उपचारांपासून दूर राहतात. नैराश्याच्या भावनेविषयी आपला मित्रपरिवार, कुटुंब, आप्तजन किंवा फॅमिली डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञांकडे व्यक्त करणे गरजेचे आहे. यामुळे समाजात या आजाराविषयी असलेले गैरसमज कमी होऊन आजारावर लागलेला कलंक कमी होण्यास मदत होईल आणि मोठय़ा प्रमाणावर उपचारापासून वंचित वर्ग पुढे येईल. एकंदरीत समाजाचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 3:43 am

Web Title: talk about depression manomani dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 मधुमेह : जंतुसंसर्ग नि करोना
2 नियोजन आहाराचे : आहार पुरोहितांचा
3  अशक्तपणा येतोय? मग आहारात करा फणसाचा समावेश
Just Now!
X