शाररिक बांध्याने उंच व्यक्तींच्या बुद्धिमत्तेचे प्रमाण (आयक्यू) उंचीने कमी असणाऱया व्यक्तींपेक्षा जास्त असू शकते असा दावा संशोधकांनी व्यक्त केला आहे.
एडिनबर्ग विद्यापाठातील संशोधकांनी उंची आणि बुद्धिमत्ता यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधावर सखोल अभ्यास केला. यातून उंचीने कमी असणाऱया व्यक्तींचा ‘आयक्यू’ उंच व्यक्तींपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.
स्कॉटीश फॅमिली हेल्थ सोसायटीच्या अभ्यासानुसार एक हजार व्यक्तींच्या ‘आयक्यू’चा आढावा घेण्यात आला. यात ‘आयक्यू’ आणि उंची यांचा संबंध तपासणाऱया विविध पद्धती वापरण्यात आल्या यात भाषिक क्षमता, प्रतिक्रिया देण्यास लागणारा वेळ आणि आठवण शक्ती यांचे मूल्यमापन केल्यानंतर उंचीने कमी असणाऱया व्यक्तींचा उंच व्यक्तींपेक्षा ‘आयक्यू’ कमी असल्याचे आढळून आले आहे.