News Flash

TATA ची नवी कार Altroz ; 21 हजारात बुकिंगला सुरूवात

बहुप्रतिक्षित प्रीमियम हॅचबॅक कार TATA Altroz, कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन बुकिंगला सुरूवात

(Tata Altroz कारला 89 व्या Geneva Motor Show शोमध्ये दाखवण्यात आलं होतं, सौजन्य - AP)

Tata Motors कडून आपली बहुप्रतिक्षित प्रीमियम हॅचबॅक कार Altroz चं अनावरण करण्यात आलं आहे. Tata Altroz पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन्ही इंजिन पर्यायांमध्येही बाजारात उतरवण्यात येणार आहे. बीएस-६ मानकांसह असलेली ही कार पाच व्हेरिअंटमध्ये (XE, XM, XT, XZ, XZ(O)) उपलब्ध असेल. Altroz ही टाटा मोटर्सची पहिली प्रीमियम हॅचबॅक आहे, जी Maruti Suzuki Baleno, Hyundai Elite i20 आणि Honda Jazz यांसारख्या प्रिमिअम हॅचबॅक गाड्यांना टक्कर देईल.

आजपासून अर्थात ४ डिसेंबरपासून या कारच्या बुकिंगला सुरूवात झाली आहे. 21 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन या कारसाठी बुकिंग करता येईल. ही कार पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केली जाणार असून त्याचवेळी कारच्या किंमतीबाबतही खुलासा केली जाईल. पाच ते आठ लाख रुपयांपर्यंत या कारची एक्स-शोरुम किंमत असण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- BS-6 इंजिनसह Mahindra XUV 300 झाली लाँच, किंमतीत बदल

फीचर्स
या कारच्या टॉप व्हेरिअंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, फ्रंट आणि रिअर फॉग लॅम्प आणि रिअर डिफॉगर यांसारखे फीचर्स आहेत. कॅबिनबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये चारही बाजूंनी फिरवता येणारं ड्रायव्ह सीट आणि दोन बाजूंना अॅडजस्ट करता येणारं फ्रंट पॅसेंजर सीट देण्यात आलंय. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह 7-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम आहे. याशिवाय यात पावर विंडो, इंजिन पुश बटन स्टार्ट/स्टॉप, फास्ट चार्जिंग, स्मार्ट की, रिअर एसी व्हेंट्स, इलेक्ट्रिक टेलगेट, क्रूझ कंट्रोल, रेन सेंसिंग वायपर, आयडल स्टार्ट स्टॉप आणि ऑटो हेडलॅम्पसह अन्य अनेक फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल एअरबैग्स, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेंसर्स, सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड सेंसिंग ऑटो डोर लॉक, इंजिन इम्मोबिलायजर, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि कॉर्नरिंग फॉग लँप यांसारखे फीचर्सही आहेत.

Tata Altroz कारला Geneva Motor Show शोमध्ये दाखवण्यात आलं होतं. मात्र हे मॉडेल बाजारात कधी उपलब्ध होणार याबाबत माहिती दिली गेली नव्हती. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता होती. ही कार टाटाच्या नव्या इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेज सपोर्ट करणारी कार आहे. यामध्ये हनीकॉम्ब मेश ग्रिल, स्लीक हेडलॅम्प्स आणि रायझिंग विंडो लाइन आहे. मागील बाजूला विंडस्क्रीनच्या खाली टेलगेटवर ब्लॅक एलिमेंट आहे, त्यालाच टेललॅम्प देखील आहे. परिणामी या कारचं लूक अत्यंत आकर्षक दिसतंय. या कारची लांबी 3990 mm, रुंदी 1755 mm आणि उंची 1523 mm आहे. या प्रीमियम हॅचबॅक कारचा व्हिलबेस 2501 mm आणि ग्राउंड क्लिअरंस 165 mm आहे. कारच्या पेट्रोल व्हर्जनचं वजन 1036 किलोग्रॅम आणि डिझेल व्हर्जनचं वजन 1150 किलोग्रॅम आहे. तर 37 लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे.

आणखी वाचा- Seltos ची जबरदस्त ‘क्रेझ’, सलग दुसऱ्या महिन्यात ठरली नंबर-1 SUV

इंजिन – 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. 1199 cc चं हे इंजिन 6000 rpm वर 85 bhp ची ऊर्जा आणि 3300 rpm वर 113 Nm टॉर्क निर्माण करतं. डिझेल व्हर्जनमध्ये 1.5-लीटर टर्बो इंजिन देण्यात आलंय. 1497 cc मोटर असलेलं डिझेल इंजिन 4000 rpm वर 89 bhp ची ऊर्जा आणि 1250-3000 rpm वर 200 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. दोन्ही इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड आहे. सध्या या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय नाहीये. पण कालांतराने ही कार ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायासह उपलब्ध केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 11:17 am

Web Title: tata altroz hatchback specifications revealed booking started to be launched in january 2020 sas 89
Next Stories
1 BS-6 इंजिनसह Mahindra XUV 300 झाली लाँच, किंमतीत बदल
2 64MP चा दमदार कॅमेरा, Redmi Note 8 Pro खरेदी करण्याची अजून एक संधी
3 USB Condom ची मागणी का सातत्याने वाढतेय?
Just Now!
X