18 January 2021

News Flash

आता भारतातच बनणार मोबाइल पार्ट्स, TATA ग्रुप ‘या’ शहरात उभारणार मोठा प्लांट?

देशाला फायदा होईलच सोबतच चीनलाही मोठा फटका बसण्याची शक्यता...

( प्रातिनिधिक छायाचित्र)

भारतात मोबाइल प्रोडक्शन करणाऱ्या काही कंपन्या आहेत, पण मोबाइल पार्ट्स अजूनही बाहेरुनच मागवावे लागतात. ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. टाटा समूहाची (Tata Group) कंपनी टाटा सन्स (Tata Sons) आता देशातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्याच्या तयारीत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातच मोबाइलचे पार्ट्स बनवण्यासाठी टाटा सन्स तामिळनाडूमध्ये मोठा प्रकल्प उभारणार आहे. या योजनेत टाटा समूह तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर, टाटा समूह या योजनेसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेणार असल्याचंही एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यातील 75 कोटी डॉलर्स ते एक अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम कंपनी एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोईंगद्वारे (ECB) जमवणार आहे.

नव्या प्रकल्पासाठी कंपनी सीईओच्या शोधात असून टाटाच्या या नव्या प्रकल्पात सर्वप्रथम आयफोनचे पार्ट्स बनवले जातील असं सांगितलं जात आहे. दरम्यान, भारतीय मार्केटमध्ये दर्जेदार मेड इन इंडिया स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने चिनी कंपन्यांची देशात मक्तेदारी वाढल्याचं बोललं जातं. जर, भारत या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला तर त्याचा देशाला फायदा होईलच सोबतच चीनलाही मोठा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 2:12 pm

Web Title: tata group plans to invest rs 11000 cr for new mobile phone manufacturing plant in tamil nadu sas 89
Next Stories
1 मेड इन इंडिया FAU-G गेम कधी होणार लाँच? लेटेस्ट रिपोर्टमधून झाला खुलासा!
2 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदीची संधी, Moto G 5G चा पहिलाच फ्लॅश-सेल
3 फक्त 99 रुपये महिना; Netflix, Amazon Prime ला टक्कर देण्यासाठी आलं नवीन ओटीटी अ‍ॅप
Just Now!
X