टाटाच्या दोन लोकप्रिय SUV Tata Hexa आणि Harrier बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीकडून हेक्सावर 2 लाख 30 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. तर, हॅरियरवरही 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत सवलत आहे. दोन्ही गाड्यांच्या विविध ऑफर आणि शहरांवर अवलंबून असतील असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

देशात एक एप्रिल 2020 पासून प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांसाठी बीएस-6 मानक लागू होणार आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बीएस-४ इंजिन गाड्यांचा स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने डिस्काउंट दिल्याची शक्यता आहे.

टाटा हेक्सामध्ये 2.2 लीटर, 4 सिलिंडर इंजिन असून मॅन्युअल ट्रांसमिशनमध्ये हे इंजिन 320Nm टॉर्कसह, 150bhp ची ऊर्जा निर्माण करतं. तर, ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये 400Nm टॉर्कसह 156bhp ची ऊर्जा मिळते. 12.99 लाख रुपये इतकी हेक्साच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत असून कंपनीने या कारचं उत्पादन थांबवल्याचं वृत्त आहे.

आणखी वाचा- आली नवीन Honda City , फीचर्स आणि किंमत काय ?

टाटा हॅरियर सध्या XE, XM, XT आणि XZ या चार व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. हॅरिअर ही एसयूव्ही ऑप्टिमल मोडय़ूलर एफिशियन्ट ग्लोबल अ‍ॅडव्हान्स्ड (ओमेगा) आर्किटेकवर उभारण्यात आली आहे. इम्पॅक्ट डिझाइन 2.0 या टाटाच्या श्रेणीतील हॅरिअर ही पहिली गाडी आहे. गाडीत दोन लिटरचे डिझेल इंजिन देण्यात आले असून सहा स्पीडचा मॅन्युअल गिअर बॉक्स आहे.

* इंजिन : 2. लिटर, 4 सिलेंडर, टर्बो चार्जर

* ताकद: 138@ 3750 आरपीएम

* टॉर्क : 350एनएम@ 1750-2500 आरपीएम

* ट्रान्समिशन: 6 स्पीड, मॅन्युअल

* किंमत : 12.99 लाख ते 17.99 लाख