News Flash

भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सची जबरदस्त सफारी स्टॉर्म कार

गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराला सेवा देणाऱ्या मारुती सुझुकी जिप्सीची जागा या नव्या कार घेतील

भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सने सफारी स्टॉर्मच्या विशेष गाड्यांची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराला सेवा देणाऱ्या मारुती सुझुकी जिप्सीची जागा या नव्या कार घेतील. टाटा भारतीय लष्कराला एकूण ३१९२ युनिट्सची डिलिव्हरी करणार आहे.

खास भारतीय लष्करासाठी बनवण्यात आलेल्या या सफारी स्टॉर्म युनिट्समध्ये स्टॅण्डर्ड मॉडेलच्या तुलनेत काही बदल करण्यात आले आहेत. फ्रंट आणि रिअर बंपरवर ब्लॅकआऊट लॅम्प्स आहे. एकूणच पहायला गेलं तर लष्करासाठी तयार करण्यात आलेल्या या गाड्या अत्यंत मजबूत बनवण्यात आल्या आहेत.

टाटा सफारी स्टॉर्ममध्ये हार्ड टॉप, ८०० किलोग्राम लोडिंग क्षमता आणि एअर कंडिशनिंग फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. टाटा मोटर्सने सफारी स्टॉर्मला स्पेशली मॅट ग्रीन कलर दिला आहे. यामध्ये क्रोमचा वापर करण्यात आलेला नाही. इतकंच नाही तर प्लास्टिक पार्ट्सनाही हिरवा रंग देण्यात आला आहे, ज्यामुळे बॉडी कलरला तो मॅच होईल.

टाटा सफारीच्या या आर्मी एडिशनमध्ये पुढे आणि मागे ब्लॅकआऊट लॅम्प देण्यात आले आहेत. यामुळे युद्घासारख्या परिस्थितीत सहजरित्या रात्री पाहणं सोपं होईल.

यामध्ये मागील बाजूला पिंटल हुक, बोनेटवर अँटिना आणि फ्रंट बम्परवर स्पॉटलाइट्स आहे. इंटिरिअरसंबंधी बोलायचं झाल्यास, यामध्ये चांगली अंडरबॉडी सेफ्टी देण्यात आली आहे. सस्पेंशनकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यामध्ये ग्राऊंड क्लिअरन्स, ४ व्हील ड्राइव्ह देण्यात आलं आहे. टाटा सफारी स्टॉर्म आर्मी एडिशनमध्ये २.२ लिटर, ४ सिलेंजर, टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन १५४ बीएचपी पॉवर आणि ४०० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इंजिनला ६ स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स लेस करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2018 7:43 pm

Web Title: tata motors safari storm for indian army
Next Stories
1 Samsung Galaxy J6 भारतात दाखल
2 आपल्या एनफिल्ड बुलेटची जगाच्या बाजारात रॉयल एंट्री
3 असा ट्रान्सफर करा तुमचा भविष्य निर्वाह निधी
Just Now!
X