News Flash

Tata Nexon EV : ‘टाटा’ची पहिली इलेक्ट्रिक कार, ‘झिपट्रॉन’ तंत्रज्ञानाचा वापर

बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यास 300 कि.मी. पर्यंतचा प्रवास

टाटा मोटर्स (Tata Motors)या भारतीय कंपनीने नेक्सॉन (Nexon EV)ही कॉम्पॅक्ट श्रेणीतील नवी कार सादर केली आहे. Tata Nexon EV ही कंपनीची पहिलीच इलेक्ट्रिक कार असून यामध्ये नवीन झिपट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही जानेवारीमध्ये लाँच होणार आहे.

1- स्पेसिफिकेशन: Nexon EV मध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. यामधील इलेक्ट्रिक मोटर 129ps ची ऊर्जा आणि 245Nm पीक टॉर्क निर्माण करते.

2- रेंज आणि चार्जिंग टाइम: ही कार एकदा पूर्ण चार्ज केली तर 300 कि.मी. पर्यंतचं अंतर पार करू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. या गाडीची किंमत 15 ते 17 लाख रुपयांच्या मध्ये राहण्याची अपेक्षा आहे. फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी एका तासात 80 टक्के चार्ज होईल, तर स्टँडर्ड एसी चार्जरद्वारे बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी जवळपास 8 तासांचा वेळ लागेल.

3- कमी ग्राउंड क्लिअरंस: नव्या नेक्सॉनचा आकार स्टँडर्ड नेक्सॉन इतकाच आहे. या गाडीची लांबी 3994 mm, रुंदी 1811 mm, उंची 1607 mm आणि व्हिलबेस 2498 mm आहे. पण, ग्राउंड क्लिअरंस स्टँडर्ड नेक्सॉनपेक्षा 4mm कमी आहे. इलेक्ट्रिक नेक्सॉनमध्ये ग्राउंड क्लिअरंस 205mm,तर स्टँडर्ड नेक्सॉनमध्ये ग्राउंड क्लिअरंस 209mm आहे.

4- डिझाइनमध्ये बदल: नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये नवीन स्लीक हेडलॅम्प, नवीन बंपर आणि रिवाइज्ड ग्रिलचा समावेश आहे. याशिवाय नवीन स्टाइलचे मशीन-कट अ‍ॅलॉय व्हिल्स, मागील बाजूला टेललँपसाठी नवे एलईडी ग्राफिक्स आहेत.

5- मुख्य फीचर्स आणि किंमत: यामध्ये फुल डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोल, फ्लॅट बॉटम स्टिअरिंग, गिअरबॉक्ससाठी रोटरी नॉब, लेटेस्ट कनेक्टिव्हिटी फीचर्ससह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम आणि क्लायमेट कंट्रोल यांसारखे फीचर्स आहेत. सुरक्षिततेसाठी या इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडी, एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेंसर्स आणि कॅमेरा, स्पीड अलर्ट सिस्टिम आणि सीट बेल्ट रिमाइंडर फीचर्स आहेत. एकदा पूर्ण चार्जिंग केल्यानंतर 300 किलोमीटरचा पल्ला गाठू शकणारी झिपट्रॉन तंत्रज्ञानाची शक्ती आणि आठ वर्षे वॉरंटी अशी वैशिष्टे असलेल्या नेक्सॉन ईव्ही कारची किंमत 15 ते 17 लाख रुपयांदरम्यान असेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 12:57 pm

Web Title: tata nexon ev launch in 2020 know price specifications and other details sas 89
Next Stories
1 Video : सीमेवरील जवानानी जिंगल बेल… जिंगल बेल म्हणत साजरा केला ख्रिसमस
2 Christmas च्या खास अंदाजात द्या शुभेच्छा , तुमच्या फोटोला बनवा Whatsapp स्टिकर
3 हा आहे जगातील सर्वाधिक पॉप्युलर आयफोन, iPhone 11 लाही टाकलं मागे
Just Now!
X