Tata Sky ने मंगळवारी आपला Binge+ हा अँड्रॉइड सपोर्ट असलेला सेट-टॉप बॉक्स (STB) 3,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्याचे जाहीर केले. कंपनीने या सेट-टॉप बॉक्सच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात केली आहे. लॉन्चिंगवेळी  Binge+ ची किंमत 5,999 रुपये होती.

काय आहे ऑफर:-
टाटा स्काय बिंज+ सेट टॉप बॉक्ससोबत ‘टाटा स्काय बिंज सर्व्हिस’ 6 महिन्यांपर्यंत मोफत देण्याची कंपनीने ऑफर आणली आहे. या सर्व्हिसद्वारे युजर्सना डिज्नी+ हॉटस्टार, सन नेक्स्ट, हंगामा प्ले, Shemaroo Me आणि Eros Now यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. टाटा स्काय बिंज सर्व्हिस संपल्यानंतर या सर्व्हिससाठी दर महिन्याला 249 रुपये आकारले जातील. याशिवाय अ‍ॅमेझॉन प्राइमचंही तीन महिन्यांपर्यंतही मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. टाटा स्काय बिंज सर्व्हिस संपल्यानंतर अ‍ॅमेझॉन प्राइमच्या सर्व्हिससाठी ग्राहकांना दर महिन्यासाठी 129 रुपये भरावे लागतील. आधीपासून असलेल्या ग्राहकांसाठीही Binge+ मध्ये अपग्रेड करण्यासाठी 3,999 रुपये द्यावे लागतील.

एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्सला टक्कर :-
या वर्षी जानेवारीमध्ये टाटा स्कायने Tata Sky Binge+ हा अँड्रॉइड सेट-टॉप बॉक्स भारतात लॉन्च केला आहे. अँड्रॉइड सपोर्ट असल्यामुळे युजर्स या सेटटॉप बॉक्सद्वारे सॅटेलाइट चॅनल आणि नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम यासारखे ओटीटी अ‍ॅप्स पाहू शकतात. किंमतीत कपात केल्यामुळे Tata Sky Binge+ ची एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्ससोबत टक्कर असेल. एअरटेल एक्स्ट्रीमची किंमतही 3,999 रुपये आहे.