News Flash

Tata Sky रिचार्जवर भन्नाट ऑफर, २ महिन्यांपर्यंत Cashback ची संधी; जाणून घ्या सविस्तर

३१ मार्च २०२१ पर्यंत ऑफर

जर तुम्हीही दर महिन्याला DTH टाटा स्कायसाठी रिचार्ज करत असाल, पण कॅशबॅक मिळत नसेल तर आता कंपनीने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सना दोन महिन्यांपर्यंत कॅशबॅक मिळवण्याची संधी आहे. सविस्तर जाणून घेऊया या ऑफरबाबत :

कंपनीच्या वेबसाइटनुसार दोन महिने कॅशबॅकची ही ऑफर ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध असेल. पण १२ महिने अर्थात एका वर्षाचं रिचार्ज एकाचवेळी करणाऱ्या ग्राहकांनाच या ऑफरचा लाभ घेता येईल. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी रिचार्ज करताना ग्राहकांनी बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डचा वापर करणं गरजेचं आहे. शिवाय टाटा स्कायच्या वेबसाइट किंवा टाटा स्काय मोबाइल अॅपद्वारे अकाउंट रिचार्ज करणाऱ्यांनाच कॅशबॅक ऑफरचा फायदा मिळू शकतो.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, रिचार्जची नेमकी रक्कम माहित नसल्यास ग्राहकाने कोणताही छोटा-मोठा आकडा किंवा १०० रुपयांचा आकडा रिचार्जसाठी टाकावा. त्यानंतर पात्र युजर्सना नेमकं किती रुपयांचं रिचार्ज करण्याची आवश्यकता आहे ते समोर दिसेल. त्यानंतर योग्य रक्कम टाकून बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डद्वारे रिचार्ज केल्यास तुम्ही कॅशबॅक मिळवू शकतात. पण, कॅशबॅकची रक्कम एकाचवेळी युजरच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार नाही. तर दोन टप्प्यात ही रक्कम युजरच्या अकाउंटमध्ये जमा होईल. पहिल्या महिन्यातील कॅशबॅक 24 तासांमध्ये, तर दुसऱ्या महिन्यासाठी कॅशबॅक सात दिवसांत जमा होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:33 pm

Web Title: tata sky dth recharge cashback offer get 2 month cashback check details sas 89
Next Stories
1 किंमत 10,999 रुपये; 64MP कॅमेरा+5000mAh बॅटरी, Moto G30 चा पहिलाच ‘सेल’
2 Redmi Note 10 Pro चा आज पहिलाच ‘सेल’, किंमत 15 हजार 999 रुपये
3 Jio चं पुढचं पाऊल! आता जगभरातील Android टीव्हींसाठी जिओ ब्राऊजर उपलब्ध!
Just Now!
X