News Flash

स्वस्त झाला Tata Sky+ HD सेटटॉप बॉक्स, कंपनीने पुन्हा केली किंमतीत कपात

जर तुम्ही नवीन सेटटॉप बॉक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी

जर तुम्ही नवीन सेटटॉप बॉक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, Tata Sky+ HD हा सेटटॉप बॉक्स आता स्वस्त झाला आहे.

4,999 रुपये इतकी या सेटटॉप बॉक्सची नवी किंमत असेल. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने आपल्या सबस्क्राइबर्ससाठी Tata Sky+ HD सेटटॉप बॉक्सची किंमत 7,890 रुपयांवरुन 5,999 रुपये केली होती. टाटा स्काय+ एचडी सेटटॉप बॉक्सची नवीन किंमत कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट झाली आहे. नवीन आणि जुन्या दोन्ही ग्राहकांना याच किंमतीत त्यांचं कनेक्शन अपडेट करता येईल. विशेष म्हणजे यासोबत तुम्हाला मल्टी टीव्ही कनेक्शन मिळेल. Tata Sky+ HD सोबत तुम्हाला वेब अ‍ॅप्स आणि 500GB इनबिल्ट स्टोरेजही मिळेल.

या सेटटॉप बॉक्सद्वारे युजर्स 1080 पिक्सलवर डॉल्बी ऑडिओसह टीव्ही पाहू शकतात. या सेटटॉप बॉक्सच्या Movies या श्रेणीमध्ये आठ भाषांमध्ये सिनेमांची नावं असतील. यापूर्वी गेल्या महिन्यातच कंपनीने आपल्या ग्राहकांना झटका देताना कॉम्प्लिमेंट्री पॅकमधून 25 फ्री-टू-एअर चॅनेल्स हटवले आहेत. त्यामुळे ते चॅनेल्स बघण्यासाठी युजर्सना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 3:55 pm

Web Title: tata sky hd set top box price reduced to %e2%82%b94999 get all details sas 89
Next Stories
1 एवढं होऊनही टेस्लाचा शेअर 90 टक्क्यांनी का वधारला? जाणून घ्या…
2 टिकटॉकचा ‘देशी’ पर्याय : चिनी अ‍ॅप बंदीनंतर ‘मित्रों’ सुसाट; डाउनलोडचा आकडा पाहून व्हाल थक्क
3 गाडी घेण्याइतके पैसे नाहीत? टेन्शन घेऊ नका; ‘ही’ वाहन कंपनी आता भाड्याने देणार गाडी
Just Now!
X