आघाडीची डीटीएच कंपनी TATA Sky ने आपल्या युजर्ससाठी कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, कंपनी ग्राहकांना दोन महिने फ्री सर्व्हिस देत आहे. मात्र, या ऑफरसाठी कंपनीने काही अटी ठेवल्या आहेत. काय आहे ‘टाटा स्काय कॅशबॅक ऑफर’ आणि कसा मिळेल युजर्सना लाभ ? जाणून घेऊया…
टाटा स्कायने ‘लाँग टर्म सब्सक्रिप्शन’ प्लॅन घेणाऱ्यांना दोन महिने मोफत सेवा देणार असल्याचे म्हटले आहे. ही ऑफर कंपनीच्या सर्व ग्राहकांसाठी असेल, पण ज्यांच्याकडे आधीच लाँग टर्म प्लॅन आहे त्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. टाटा स्कायची दोन महिन्यांची मोफत सेवा हवी असल्यास युजर्सना एकाचवेळी 12 महिन्यांचे रिचार्ज करावे लागेल. तसेच, ऑफरचा घेण्यासाठी ग्राहकांना सिटी बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डवरूनच आपले टाटा स्काय अकाउंट रिचार्ज करावे लागेल.
30 जून 2020 पर्यंत TATA Sky च्या या ऑफरचा लाभ घेता येईल. सिटी बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे रिचार्ज केल्यानंतर दोन दिवसांमध्ये कंपनी युजरच्या अकाउंटमध्ये एक महिन्याचा कॅशबॅक आणि नंतर सात दिवसांमध्ये दुसऱ्या महिन्याचे कॅशबॅक क्रेडिट करेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 28, 2020 3:19 pm