जर तुम्हीही कमी किंमतीमध्ये एखाद्या कंपनीचा सेट-टॉप बॉक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली बातमी आहे. Tata Sky ने आपल्या तीन सेट-टॉप बॉक्सवर शानदार ऑफर आणली आहे. जर तुम्हाला अँड्रॉइड सेट-टॉप बॉक्स पाहिजे असेल तर तुम्ही Tata Sky Binge+ खरेदी करु शकतात, नाहीतर SD, HD, HD 4K किंवा Tata Sky+ HD सेट-टॉप बॉक्सही स्वस्तात खरेदी करु शकतात. यात Tata Sky SD सर्वात स्वस्त आणि Tata Sky HD 4K सेटटॉप बॉक्स सर्वात महागडा आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीने आपल्या या तीन सेट-टॉप बॉक्सच्या किंमतीत मर्यादित कालावधीसाठी कपात केली आहे. ही कपात मर्यादित कालावधीसाठी असेल हे स्पष्ट करण्यात आलं आहे, मात्र नेमका कधीपर्यंत ऑफरचा लाभ घेता येईल याची माहिती देण्यात आलेली नाही.

Tata Sky Binge+ सेट-टॉप बॉक्स :-
टाटा स्कायच्या या सेट-टॉप बॉक्सची मूळ किंमत 2,499 रुपये आहे, पण आता तुम्ही हा सेट-टॉप बॉक्स सवलतीसह खरेदी करु शकतात. कंपनीकडून या बॉक्सवर 200 रुपयांची सवलत दिली जात आहे. या डिस्काउंटसह खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ‘TSKY200’ कोडचा वापर करावा लागेल. टाटा स्काइ बिंज+ सेट-टॉप-बॉक्सवर युजर्सना सर्व लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळतो. यासोबतच युजर जेव्हा पाहिजे तेव्हा रिमोटद्वारे अँड्रॉइड टीव्हीवरुन सॅटेलाइट टीव्ही स्विच करु शकतात. याशिवाय, कंपनी या बॉक्ससोबत ग्राहकांना एका महिन्यासाठी मोफत सर्व्हिसची ऑफर देत आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Mahavitaran Jobs
Mahavitaran Jobs : महावितरण मध्ये नोकरीची संधी! ५३४७ रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

Tata Sky HD/SD सेट-टॉप बॉक्स :-
कंपनीचा हा सेट-टॉप बॉक्सची मूळ किंमत 1499 रुपये आहे. मात्र, ऑफरअंतर्गत यावर 150 रुपयांची सवलत मिळेल, त्यामुळे हा बॉक्स 1249 रुपयांत खरेदी करता येईल. डिस्काउंटसाठी ग्राहकांना ‘TSKY150’ कोडचा वापर करावा लागेल. या सेट-टॉप बॉक्सचे युजर एचडी क्वॉलिटी कंन्टेंट बघू शकतात. यात डॉल्बी सराउंड साउंडचा सपोर्टही आहे.

Tata Sky+ HD 4K सेट-टॉप बॉक्स :-
टाटा स्कायच्या या सेट-टॉप बॉक्सची मूळ किंमत 4,999 रुपये आहे. मात्र, ऑफरमध्ये हा बॉक्स 4,599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या ऑफरअंतर्गत डिस्काउंट मिळवण्यासाठी ग्राहकांना ‘TSKY400’ कोडचा वापरन करावा लागेल. या बॉक्ससोबत कंपनी 625 तासांपर्यंतचा लाइव्ह टीव्ही कंन्टेंट देते. यात एक खास फिचरही आहे, त्याद्वारे युजर आपली आवडती वेबसीरिज सेट-टॉप-बॉक्सच्या स्टँड बाय मोडमध्ये रेकॉर्ड करु शकतात. शिवाय लाइव्ह कार्यक्रम पॉज आणि रिवाइंड करण्याची सेवाही यात आहे. या सेट-टॉप बॉक्सचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वापरतकर्त्याला एकाचवेळी तीन शो रेकॉर्ड करता येतात.