21 January 2021

News Flash

Tata Sky ची ‘डबल धमाका’ ऑफर, ‘या’ सहा सेवांच्या किंमतीत झाली 50% कपात

2 ऑगस्टपर्यंत घेता येईल ऑफरचा फायदा...

डीटीएच सेवा पुरवणारी देशातील आघाडीची कंपनी टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. टाटा स्कायने आपल्या सहा सेवांच्या दरांमध्ये 50 टक्क्यांची कपात केली आहे.

कंपनीने या ऑफरला ‘डबल धमाका’ असं नाव दिलंय. ट्विटरद्वारे टाटा स्कायने या ऑफरबाबत माहिती दिली. 26 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत या ऑफरचा फायदा घेता येईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.


या ऑफरअंतर्गत Tata Sky Smart Games आणि Dance Studio चे दर 50 टक्क्यांनी कमी केले आहेत. या ऑफरमध्ये ग्राहकांना डबल ‘जीतोस’ (Zeetos)कमावण्याची संधी आहे, असंही कंपनीने ट्विटमध्ये म्हटलंय. Tata Sky Zeetos हा एक लॉयल्टी प्रोग्राम आहे असून जीतोस पॉइंट्स रीडिम करुन लहान मुलांसाठी रिमोट कंट्रोल इलेक्ट्रॉनिक हेलिकॉप्टर, हॉटव्हील कार्स, बार्बी डॉल अशी खेळणी खरेदी करता येतील. टाटा स्कायची डबल धमाका ऑफर Tata Sky Smart Games, Fun Learn, Dance Studio, English, Vedic Maths आणि Fitness या सहा सेवांसाठी लागू असणार आहे. ऑफरनुसार, या सहा सेवा दोन ऑगस्टपर्यंत 30 रुपये प्रति महिना दराने उपलब्ध असतील. सामान्यपणे कंपनी या सेवांसाठी प्रति महिना 60 रुपये आकारते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 10:44 am

Web Title: tata sky slashes prices of 6 services till august 2 get details sas 89
Next Stories
1 फक्त 90 मिनिटांत सामानाची होम डिलिव्हरी, फ्लिपकार्टने आणली नवीन Flipkart Quick सर्व्हिस
2 आठ हजारांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स, Realme च्या स्वस्त स्मार्टफोनवर शानदार ऑफर
3 अ‍ॅपलच्या स्वस्त iPhone वर आकर्षक डिस्काउंटची ऑफर, आज अखेरची संधी
Just Now!
X