आकर्षक कर कपात लक्षात घेऊन, एक सामान्य गुंतवणूकदार त्याच्या पोर्टफोलिओमध्ये लाइफ इन्शुरन्सला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल. कारण, आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत इन्शुरन्समधील गुंतवणूकीमुळे तुम्हाला दिड लाखाची सूट मिळू शकते. एकूणच या क्षेत्रातील निवडक गुंतवणूकीचं पात्र ठरू शकत असल्याने इन्शुरन्सकडे प्रमुख स्पर्धक म्हणून पाहिले जाते. कर बचतीचे हे पैलू लक्षात घेऊन आपण प्रत्येक वित्तीय वर्षी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन इन्शुरन्स प्लॅन जोडण्याचा प्रयत्न करू शकता. तथापि, केवळ कर बचत उद्देशांसाठी इन्शुरन्स प्लॅन घेणे योग्य नाही.

अनेक कमी प्रीमियम आपल्याला कर-बचतीच्या लाभांसह सहजपणे एक कव्हर खरेदी करण्याचे आमिष दाखवतात जे नगण्य लाभांसह कमी रक्कम देतात. त्याऐवजी, आपण आपल्या सर्वात महत्वाच्या कार्याचे (आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबासाठी लाईफ कव्हर प्रदान करण्याचे), मूल्यमापन करून नवीन धोरणासाठी आपला शोध सुरू करणे चांगले आहे.

लाइफ इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी आपण काय तपासले पाहिजे ?

सगळ्यात आधी आपल्या कुटुंबासाठी आपले उत्पन्न, जीवनशैली, आर्थिक उद्दिष्टे आणि कर्जाच्या परतफेडीच्या आवश्यकतेनुसार लाईफ कव्हरची गणितं जुळवणे आवश्यक आहे. महागाईला लक्षात ठेवून महत्त्वपूर्ण कव्हरची निवड करा. लाइफ इन्शुरन्स हे एक दीर्घकालीन साधन आहे आणि जोपर्यंत आपले कुटुंब आपल्यावर अवलंबून असेल तोपर्यंत आपण एक आदर्श कालावधी निवडला पाहिजे. उदाहरणार्थ, समजा आता आपले मूल पाच वर्षांचे आहे आणि आजपासून २० वर्षानंतर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अपेक्षित आहे. म्हणून, पुढील २० वर्षे आपले मूल आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असेल, तर आपल्यावर निर्भर व्यक्तींच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपले कव्हरेज किमान २०-३० वर्षे टिकले पाहिजे. आता आदर्श कव्हरेज काय असते? योग्य त्या कव्हरेजची गणना करण्यासाठी अनेक नियम आहेत. पण साधारणपणे याला आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १०-२० पट ठेवण्याचा प्रयत्न करा. तर, समजा आपले वर्तमान वार्षिक उत्पन्न ५ लाख असेल तर आपले कव्हरेज ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत असायला हवे.

कर लाभाला दुय्यम प्राधान्य द्यावे

आपल्या कुटुंबाच्या गरजा आणि त्यांना पूर्ण करण्याची किंमत आपल्या पॉलिसी खरेदी करण्याच्या निर्णयाला मार्गदर्शन करण्याची परवानगी देते. त्यामुळे केवळ कर लाभ प्राप्तीसाठी कोणतीही पॉलिसी खरेदी करू नका. आपण खरेदी करत असलेल्या पॉलिसीबद्दल जाणून घेण्यासाठी विविध योजनांची तपशीलवार तुलना करा. योग्य निर्णय घेण्यासाठी प्रीमियम आणि तुम्हाला महिन्याला भरावा लागणारा हाप्ता यांच्या प्रमाणाची तुलना करा. या तुलनेमुळे तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल.

पहिले लाईफ कव्हर खरेदी करत असल्यास

इन्शुरन्स आणि गुंतवणूकीला एकत्र करू नये. आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या संरक्षित करणे हा इन्शुरन्स प्लॅनचा प्राथमिक फायदा असतो. हे लक्षात घेऊन, पहिल्यांदा इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना टर्म कव्हरला प्राधान्य द्या. याचे कारण म्हणजे टर्म प्लॅनचे प्रीमियम कमी असले तरीही, ते आपल्याला पुरेसे कव्हरेज देते. शिवाय, नावाप्रमाणेच आपण आपला पॉलिसी प्रीमियम भरणे थांबवून वाटेल तेव्हा टर्म प्लॅनमधून बाहेर पडू शकता. आपण आपल्या टर्म इन्शुरन्स प्लॅनची व्याप्ती वेळेनुसार, उत्पन्नात वाढ झाल्यानंतर वाढवू शकता, पुढे आपण आपल्या गरजा आणि सोयीनुसार त्याला सानुकूलित करू शकता.

अतिरिक्त कव्हरेज खरेदी करत असल्यास

जर आपल्या नावावर एकाहून जास्त लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असल्यास, नवीन पॉलिसी खरेदीच्या हेतूचे मूल्यांकन करा. जेव्हा आपल्याला वाटेल की आपल्या विद्यमान पॉलिसीवरील कव्हर कमी आहे तेव्हा आपल्याला पॉलिसीची आवश्यकता भासू शकते. संपत्ती जमा करण्यासाठी आपण पॉलिसीचा विचार करू शकता किंवा केवळ कर-बचतीच्या उद्देशांसाठी आपण टर्म इन्शुरन्स खरेदी करू शकता. हेतू कोणताही असो, आपल्याला पुरेसे लाभ मिळविण्यासाठी आणि आपल्या इन्शुरन्स पॉलिसीवर चांगले रिटर्न मिळवण्यासाठी आपण योग्य प्रीमियम भरत आहात ना हे सुनिश्चित करा. एकूणच आपल्या विविध आर्थिक गरजांसाठी योग्य इन्शुरन्सची निवड करा.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार