ऑफिस किचनमध्ये असलेल्या टी बॅग्स या टॉयलेट सीटपेक्षाही अस्वच्छ असतात असं एका संशोधनातून समोर आलं आहे. टी बॅग्सवर टॉयलेट सीटपेक्षाही १७ पटींनी अधिक जंतू असल्याचं ‘इनिशिअल वॉशरुम हायजिन’च्या संशोधनात म्हटलं आहे. ऑफिसच्या किचनमध्ये असणाऱ्या भांड्यांवर सर्वाधिक बॅक्टेरिया आढळतात. त्यातून फ्रिजचे हँडल, चहाची किटली, चहाचा कप या ठिकाणी बॅक्टेरियांची संख्या ही टॉयलेटपेक्षा अधिक असल्याचं ‘इनिशिअल वॉशरुम हायजिन’नं म्हटलं आहे.

ऑफिसमध्ये चहा करण्याकरता टी बॅग्स ठेवलेल्या असतात तिथेही जंतूची वाढ मोठ्या प्रमाणात होते. यासाठी फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांचा आळशीपणा. चहाची तल्लफ आल्यानंतर ऑफिसमधले कर्मचारी लगेच चहा घ्यायला धावतात. चहा पिण्याआधी आपले हात स्वच्छ धुवावे असं कोण्याच्याही मनात येत नाही. त्याच हातानं ते चहा तयार करतात. अस्वच्छ हातांनी ते टी बॅग्सदेखील हाताळतात. ऑफिसमध्ये काम करण्याऱ्या ८० % कर्मचाऱ्यांनी आपण चहा तयार करताना हात स्वच्छ धुत नसल्याचं मान्य केलं. ऑफिस किचनमधल्या टी बॅग्सवर टॉयलेट सीटपेक्षाही अधिक जंतू असल्याचे या संशोधनातून निष्पन्न झाले आहे.