‘बजेट’ स्मार्टफोन लाँच करणाऱ्या Tecno Mobile ने आज आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने स्पार्क सीरिजमध्ये TECNO Spark 7 हा नवीन स्मार्टफोन आणला आहे. TECNO Spark 7 या फोनमध्ये कमी किंमतीत दमदार बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि अनेक खास फिचर्स मिळतात. कंपनीने TECNO Spark 7 हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंट आणि तीन कलर्सच्या पर्यायांमध्ये लाँच केला आहे.

Tecno Spark 7 चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स :-
Tecno Spark 7 मध्ये 6.53 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच एचडी प्लस डिस्प्ले असून सुरक्षेसाठी रिअर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फोनच्या मागील बाजूला 16MP क्षमतेचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून याला एआय लेन्स(AI) आणि क्वॉड फ्लॅशचा सपोर्ट आहे. शिवाय फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP क्षमतेचा फ्रंट कॅमेराही आहे. Tecno Spark 7 स्मार्टफोन अँड्राइड 11 वर कार्यरत (2GB रॅमसाठी अँड्राइड 11 Go) असून Helio A25 quad-core प्रोसेसरचा सपोर्ट आहे. फोनमधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्यायही आहे. याशिवाय ग्राहकांना फोन वापरताना चांगला बॅकअप मिळावा यासाठी फोनमध्ये कंपनीने तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे.

Tecno Spark 7 किंमत :-
TECNO Spark 7 हा स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज पर्यायांमध्ये आणला आहे. याच्या 2GB रॅम + 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे. तर, 3GB रॅम + 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत लाँच ऑफर अंतर्गत फक्त 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. पण नंतर यात ५०० रुपयांची वाढ होईल. हा स्मार्टफोन स्‍प्रूस ग्रीन, मॅग्नेट ब्लॅक आणि मॉर्फस ब्लू अशा तीन पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. फक्त ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन हा फोन खरेदी करता येईल. 16 एप्रिल रोजी फोनसाठी पहिला सेल आहे.