News Flash

कमी झोपणाऱ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक; संशोधक म्हणतात, “झोपेचा थेट संबंध मानसिक आरोग्याशी”

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची

(प्रातिनिधिक फोटो)

मानसिक आरोग्य हा विषय अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा नव्याने चर्चेत आला आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून मानसिक स्वास्थ आणि मानसिक ताणतणाव यासंदर्भात वेगवेगळ्या संस्था अभ्यास आणि संशोधन करत आहे. हा विषय सध्या चर्चेत असला तरी ही एक गंभीर समस्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र जर्नल ऑफ चाइल्ड सायकोलॉजी अॅण्ड सायकायट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनामध्ये तरुण मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कमी झोपणे आणि डिप्रेशनचा थेट संबंध असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंग अॅण्ड गोल्डस्मीथ्स आणि फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एकत्रितपणे मुलांच्या झोपण्याच्या सवयी आणि मानसिक तणाव यामधील संबंध शोधून काढण्यासंदर्भात काम केलं आहे. या अभ्यासादरम्यान संशोधकांनी तरुणांच्या झोपेची शैली म्हणजेच पॅटर्न, झोपेचा दर्जा आणि किती काळ झोपतात यासंदर्भातील अभ्यास केला. या अभ्यासानंतर मानसिक आरोग्य आणि झोप न येणे याचा थेट संबंध असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या संशोधनामध्ये ४ हजार ७९० जणांना त्याच्या झोपेच्या सवयींबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. ज्या मुलांनी मानसिक अस्वस्थता अधिक असल्याचे मत व्यक्त केलं त्या मुलांना पूर्ण झोप मिळत नसल्याचं या सर्वेक्षणामधून दिसून आलं. या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी आठवड्यात रोज आठ तास झोपत असल्याचं सांगितलं. तर विकेण्डला नऊ ते साडेनऊ तास झोप होते असंही अनेकांनी सांगितलं. पूर्ण आणि योग्य तितकी झोप घेणाऱ्या सर्व जणांनी मानसिक आरोग्यासंदर्भात जास्त तक्रार नसल्याचं म्हटलं आहे. तर सात तास किंवा कमी झोप घेणाऱ्यांना मानसिक आजारासंदर्भात चिंता वाटत असल्याचं सांगितलं.

रिडिंग युनिव्हर्सिटीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजीच्या प्राध्यापक असणाऱ्या डॉ. फेथ ऑर्चर्ड यांनी या संशोधनाबद्दल बोलताना, “तरुणांचे मानसिक आरोग्य आणि झोप याचा संबंध आहे हे आम्ही नुकत्याच केल्या संशोधनामधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ज्या मुलांना कमी झोप मिळते त्या मुलांनीच या सर्वेक्षणामध्ये मानसिक अस्वस्थता आणि डिप्रेशन असल्यासारखं वाटतं असल्याचा अभिप्राय नोंदवला,” असं सांगितलं.

“ज्या लोकांनी डिप्रेशनसंदर्भात चिंता व्यक्त केली ते इतरांपेक्षा ३० मिनिटं उशीरा झोपायला जात असल्याचं निरिक्षणांमधून लक्षात आलं. यापैकी काही तरुणांना चांगल्या दर्जाची आणि गरजेइतकी झोप मिळत नसल्याचे दिसून आलं. एकंदरितच तरुणांना मानसिक आधार देताना त्यांच्या झोपेसंदर्भातही आपण बोललं पाहिजे आणि त्याबद्दल चर्चा केली पाहिजे,” असंही फेथ यांनी सांगितलं.

एकंदरितच हा अभ्यास परदेशातील विद्यार्थ्यांवर करण्यात आला असला तरी या अभ्यासामधून रात्री होणारी जागरणे थांबवणे गरजेचे असल्याचेच दिसून येत आहे. तसेच  शरीराला आवश्यक असणारी आठ तासांची पूर्ण झोप घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचेही या अभ्यासातून दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:37 pm

Web Title: teens who sleep less more likely to suffer from depression reveals study scsg 91
Next Stories
1 चार कॅमेऱ्यांचा Oppo A9 2020 झाला स्वस्त, किंमतीत झाली भरघोस कपात
2 Vodafone च्या प्रीपेड युजर्ससाठी भन्नाट ऑफर, ‘या’ प्लॅनवर मिळतोय फ्री 5GB एक्स्ट्रा डेटा
3 तातडीने डिलीट करा ‘हे’ 47 अ‍ॅप्स, गेमच्या नावाखाली देतायेत धोका
Just Now!
X