News Flash

Airtel ची अनोखी ऑफर; स्मार्टफोन खरेदीसाठी देणार लोन

पाहा काय आहे ऑफर

देशातील मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. ग्राहकांना ४ जी स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एअरटेल आता लोन देणार आहे. एअरटेलची २ जी सेवा वापरणारे ग्राहक आपल्या आवडीचा ४ जी फोन विकत घेण्यासाठी एअरटेलकडून लोन घेऊन फोन खरेदी करू शकतात. यासाठी मात्र त्यांना काही रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागणार आहे. त्यानंतर एका विशेष प्लॅनसह त्यांना स्मार्टफोन देण्यात येईल.

एअरटेलनं स्मार्टफोसाठी लोन देण्यासाठी आयडीएफसी या बँकेसह करार केला आहे. याअंतर्गत एअरटेलची २ जी सेवा वापरणाऱ्या ग्राहतांना ४ जी अथवा ५ जी तंत्रज्ञान असलेला फोन घेण्यासाठी कर्ज देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ग्राहक किमान ६० दिवस एअरटेलचा अॅक्टिव्ह ग्राहक असणं अनिवार्य आहे.

या ऑफर अंतर्गत ग्राहकांना एअरटेलच्या लँडिंग पार्टनरला ३ हजार २५९ रूपयांच्या डाऊन पेमेंटला ६०३ रूपये प्रति महिन्याप्रमाणे द्यावे लागतील. लोनचा कालावधीही १० महिन्यांचा असेल. म्हणजेच ग्राहकाला एकून ९ हजार २८९ रूपये द्यावे लागतील. एअरटेलनं दिलेल्या माहितीनुसार याची मोबाईलसह किंमत ९ हजार ७३५ रूपये असणार आहे. यासोबत एअरटेलचा २८ दिवसांचा २४९ रूपयांचा पॅकही मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि १.५ जीबी डेटा देण्यात येतो. ३३० दिवसांच्या हिशोबानं ग्राहकांना या पॅकसाठी २ हजार ९३५ रूपये द्यावे लागणार आहे. त्यामुळे याची एकूण किंमत ९ हजार ७३५ रूपये होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 4:58 pm

Web Title: telecom company airtel giving loan to 2g customers to upgrade 4g phones down payment emi free data calling jud 87
Next Stories
1 आजपासून भारतातील जुन्या युजर्ससाठी देखील होणार PUBG बंद!
2 जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व…
3 महिलांमध्ये कर्करोग होण्याची ‘ही’ आहेत कारणं, ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Just Now!
X