01 June 2020

News Flash

एअरटेलचा जिओला झटका; ट्रायकडे केली ‘ही’ मागणी

एअरटेलची मागणी मान्य झाल्यास जिओला मोठा झटका बसणार आहे.

इंटरकनेक्शन यूसेज चार्जेसवर (आययूसी) सुरू असलेलं टेलिकॉम वॉर सध्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. एकीकडे रिलायन्स जिओला आययूसी चार्जेसमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रिचार्ज व्हाऊचर्समध्ये आययूसी चार्जेस अॅड करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच भारती एअरटेलने हे चार्जेस संपवण्याचा कालावधी वाढवण्याची मागणी दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) केली आहे. यापूर्वी याची डेडलाईन जानेवारी २०२० पर्यंत होती. सध्या ४० कोटींपेक्षाही अधिक मोबाईल युझर्स २जी नेटवर्कचा वापर करत असल्याची माहितीही एअरटेलनं यावेळी दिली.

लंडनच्या GSMA च्या अहवालात २०२५ पर्यंत भारतातील १२ ते १३ टक्के युझर्स २ जी मोबाईल वापरतील असं म्हटलं आहे. त्याचाच एअरटेलनं आधार घेतला आहे. अशा परिस्थितीत झिरो आययूसी चार्जेस ऐवजी सध्याची स्कीम सुरू ठेवण्याची मागणी एअरटेलकडून करण्यात आली आहे. रिलायन्स जिओनं एअरटेलच्या या मागणीचा विरोध केला होता. तसंच आययूसी चार्जेस शून्य करण्याची मागणीही केली होती.

दूरसंचार नियामक प्राधिकरणानं २०१७ साली इंटरकनेक्ट युसेज चार्ज (आययूसी) प्रति मिनिट १४ पैशांवरुन ६ पैशांवर आणला होता. जानेवारी २०२० पर्यंत हा चार्ज बंद करण्याचे ट्रायचे उद्दिष्टय होते. जिओ नेटवर्कवर व्हॉइस कॉल्स पूर्णपणे मोफत असल्यामुळे आतापर्यंत कंपनीला भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडीया या प्रतिस्पर्धी कंपन्यांना १३,५०० कोटी रुपये भरावे लागले. त्यानंतर जिओनं अन्य मोबाईलवर कॉलसाठी ६ पैसे प्रति मिनिटांचा दर आकारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आययूसी पॅकेजही लाँच केलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या नवे पॅक्सही लाँच केले होते.

आणखी वाचा- ‘ट्राय’कडून ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सेवा’ सहा दिवस बंद, कारण…

कंपनीने २२२ रुपये, ३३३ रुपये, ४४४ रुपये आणि ५५५ रुपयांचे नवे प्लॅन आणले. यामध्ये ग्राहकांना जिओ क्रमांकावर अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज २ GB इंटरनेट डेटा, दररोज १०० एसएमएस आणि जिओव्यतिरिक्त अन्य कोणत्याही क्रमांकावर फोन केल्यास सहा पैसे प्रति मिनिट IUC (इंटरकनेक्ट युजेस चार्ज) दरांनुसार एक हजार मिनिट वापरण्यास मिळतील. या चारही प्लॅन्सची वैधता वेगवेगळी असून २२२ रुपयांच्या प्लॅनची वैधता एक महिना (२८ दिवस), ३३३ रुपयांच्या प्लॅनची वैधता दोन महिने (५६ दिवस), ४४४ रुपयांच्या प्लॅनची वैधता तीन महिने (८४ दिवस) आणि ५५५ रुपयांच्या प्लॅनची वैधताही तीन महिने (८४ दिवस) आहे. या सर्व प्लॅनमध्ये मिळणारे लाभ सारखेच आहेत, केवळ ५५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये आययूसी अंतर्गत एक हजार मिनिटांऐवजी अधिक म्हणजे तीन हजार मिनिटं मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2019 1:25 pm

Web Title: telecom operator airtel requested trai to continue iuc charges for next two year reliance jio jud 87
Next Stories
1 ‘आयटीसी’ने लाँच केलं जगातलं सर्वाधिक महागडं चॉकलेट, किंमत वाचून उडालच…
2 लहानांच्या विश्वातला व मोठ्यांच्या आठवणीतला…दिवाळीचा किल्ला !
3 Benelli ची सर्वात स्वस्त बाइक लाँच, कंपनीची पहिलीच ‘क्लासिक’ मोटरसायकल
Just Now!
X