24 November 2020

News Flash

जर्मन कंपनीचा 32 इंची स्मार्ट TV भारतात लाँच; किंमत फक्त 9,999 रुपये

दमदार फीचर्स असलेल्या या टीव्हीमध्ये सिनेमा आणि क्रिकेट असे दोन वेगवेगळे मोड

भारतात स्मार्ट टीव्हीचा जोरदार ट्रेंड वाढतोय. आता जर्मनीच्या Telefunken कंपनीने भारतात आपला नवा स्मार्ट टीव्ही लाँच केलाय. Telefunken ने भारतात 32 इंची ‘एचडी रेडी स्मार्ट टीव्ही TFK32QS’ लाँच केला आहे. 9 हजार 999 रुपये किंमत असलेल्या Telefunken च्या टीव्हीची विक्री ऑफलाइन स्टोअर्समधून होईल.

Telefunken ने गेल्या चार महिन्यांमध्ये भारतात आठपेक्षा अधिक टीव्ही आणले असून त्यात एचडी, फुल एचडी, 4के अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हींचा समावेश आहे. TFK32QS मध्ये अँड्रॉइड ओरियो 8.0 चा सपोर्ट आहे. याशिवाय क्वॉड-कोर प्रोसेसर देखील आहे. या टीव्हीत एक जीबी रॅमसह 8 जीबी स्टोरेज मिळेल. या टीव्हीत ‘Streamwall UI’ चा सपोर्ट असून याद्वारे युजर्सना 17,00,000 पेक्षा अधिक तास मोफत व्हिडिओ पाहता येतील. या टीव्हीसोबत ‘मुव्ही बॉक्स’चं मोफत सब्सक्रिप्शन मिळेल, त्यात 7,000 पेक्षा अधिक सिनेमे असतील. या टीव्हीवर Hotstar, Zee5, Sony Liv, Voot, Alt Balaji आणि Jio Cinema यांसारख्या अ‍ॅप्सचा सपोर्टही मिळेल.

टीव्हीचं पॅनल ए-प्लस ग्रेड असून टीव्हीमध्ये सिनेमा आणि क्रिकेट असे दोन वेगवेगळे मोड आहेत. टीव्हीत 20W स्पीकर आहेत, यामध्ये पाच ऑडिओ मोड्स दिले आहेत. यात ब्लूटूथचाही सपोर्ट मिळेल, म्हणजे ब्लूटूथ स्पीकरही टीव्हीला कनेक्ट करु शकतात. टीव्हीत दोन HDMI, दोन USB आणि एक ऑप्टिकल आउटपुट पोर्ट आहे. तसेच, एअर माउस आणि स्क्रीन मिरर फीचर आहे. यासोबत एक वर्षाची वॉरंटी मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2020 3:49 pm

Web Title: telefunken 32 inch hd ready smart tv launched price rs 9990 know all details sas 89
Next Stories
1 Apple HomePod भारतात दाखल, Amazon Echo ला मिळणार टक्कर
2 JIO ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना थायलंडला जाण्याची संधी
3 नव्या अवतारात आली Renault Triber , किंमतही बदलली
Just Now!
X