गुरूवारी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईट्सवरील युझर्सनाही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला होता. याचा फायदा टेलीग्रामला झाला आहे. २४ तासांत ३० लाख नवीन युझर्स जोडले गेल्याचा दावा टेलीग्राम कंपनीने केला आहे. तब्बल ८ तासांपर्यंत तांत्रिक अडचणीमुळे फेसबुक वापरण्यास अडथळा निर्माण होत होता.

फेसबुक डाऊन झाल्याचा सर्वाधिक फायदा टेलीग्रामला झाला आहे. टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पॉवेल डूरोव यांनी याची माहिती दिली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ३० लाख नवीन युझर्स टेलीग्रामला जोडले आहे. नवीन जोडले गेलेल्याना सांगू इच्छितो की, टेलीग्राम हे मोफत एनक्रिप्टेड मेसेजिंग सर्विस प्लॅटफॉर्म आहे.

गेली दोन दिवस तंत्रज्ञान क्षेत्रासाठी कठीण गेले होते. पहिल्यांदा गुगलची सर्व्हिस थंड पडली होती. त्यातच फेसबुक आणि इन्स्टाग्रामही डाऊन झाले. त्यामुळे युझर्सला याचा चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे युझर्सने पर्याय निवडायला सुरूवात केली होती. व्हॉट्सअॅप सारखेच असणारे टेलीग्रामला लोकांनी पसंती दिल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ३० लाख नवीन युझर्स जोडले गेले आहेत.

फेसबुकवर “Down for required maintenance” असा संदेश झळकत असून इन्स्टाग्राम युझर्सनाही अशाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी देखील अनेक युझर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. इतके तास फेसबुकवर तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याने ट्विटरवर अनेक युझर्सनी राग व्यक्त केला. तर काहींनी यावरुन ट्विटरवर विनोदही ट्विट केले.