इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप टेलीग्राम (Telegram) बुधवारी जगभरातील काही ठिकाणी ठप्प झालं होतं. काही दिवसांपूर्वीच गुगलच्या सेवाही जगभरात ठप्प झाल्या होत्या. Telegram ने अद्याप सेवा ठप्प होण्याचं कारण सांगितलेलं नाही, पण सेवा ठप्प झाल्या होत्या याला दुजोरा दिला आहे.


Telegram ठप्प झाल्याने मध्य आशिया आणि युरोपच्या युजर्सना सर्वाधिक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या Telegram ची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. Downdetector नुसार टेलिग्राम ठप्प झाल्यानंतर अर्ध्या तासातच हजारो युजर्सनी सेवा ठप्प झाल्याची तक्रार सोशल मीडियावर केली. यापूर्वी पाच डिसेंबर रोजीही टेलीग्राम डाउन झालं होतं. त्यावेळी आशियातील युजर्सना सर्वाधिक फटका बसला होता.

(Google वर नाही झाला सायबर अटॅक, कंपनीने दिलं स्पष्टीकरण; सांगितलं सेवा ठप्प होण्याचं नेमकं कारण)

एका आठवड्यात तीन मोठ्या टेक कंपन्यांची सेवा ठप्प :-
या एकाच आठवड्यात गुगल, नेटफ्लिक्स आणि टेलीग्राम यांसारख्या तीन मोठ्या कंपन्यांच्या सेवा ठप्प झाल्या. १४ डिसेंबर रोजी गुगलच्या जीमेल, युट्यूबसहीत अनेक सेवा जवळपास ४५ मिनिटे ठप्प झाल्या होत्या. तर, १५ डिसेंबर रोजी Netflix देखील जवळपास अडीच तास ठप्प झालं होतं, याचा सर्वाधिक फटका आयओएस युजर्सना बसला.