व्होडाफोन- आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या तिन्ही आघाडीच्या कंपन्यांनी टॅरिफ दरवाढ लागू केली आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची टॅरिफ दरवाढ तीन डिसेंबरपासूनच लागू झाली होती, तर रिलायंस जिओची दरवाढ सहा डिसेंबरपासून लागू झाली. तिन्ही कंपन्यांनी त्यांच्या जुन्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. तसेच या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे देखील आता कमी-अधिक मिळणार आहेत. जर तुम्ही वैधतेसह कॉलिंग आणि डेटा बेनिफिट असलेले 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज करायचा विचार करत असाल तर तिन्ही कंपन्यांकडे असे प्लॅन्स उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायंस जिओच्या 200 रुपयांपर्यंतच्या प्रीपेड प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत. यात एअरटेल आणि व्होडाफोनचा एक प्लॅन 200 रुपयांपेक्षा केवळ 19 रुपये महाग आहे, तर जिओचे प्लॅन 200 रुपयांपर्यंत आहेत.

एअरटेल: 149 आणि 219 रुपयांचा प्लॅन –
या दोन्ही प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 28 दिवसांसाठी एकूण 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस मिळताल. तर, 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1 जीबी डेटा आणि प्रतिदिन 100 एसएमएस यांसारख्या सुविधा आहेत.

व्होडाफोन: 149 आणि 219 रुपयांचा प्लॅन –
149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग , 28 दिवसांसाठी एकूण 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस मिळतील. तर, 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवस वैधता, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 1 जीबी डेटा आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळतील.

आणखी वाचा – टेलिकॉम कंपन्यांकडून पुन्हा झटका ? मोबाइल रिचार्ज वाढण्याची शक्यता

रिलायंस जिओ: 149 आणि 199 रुपयांचा प्लॅन –
एअरटेल आणि व्होडाफोनच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी जिओकडे 149 आणि 199 रुपयांचे दोन प्लॅन आहेत. 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवस वैधता, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग, जिओ ते अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 300 मिनिट, दररोज 1 जीबी डेटा आणि प्रतिदिन 100 एसएमएस मिळतील.