– निरंजनकुमार लक्ष्मण उपाध्ये

तुमच्याकडे काही काळासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असल्यास तुम्हाला त्याबाबत घोटाळा किंवा घोटाळ्याचा प्रयत्न झाल्याचे कधीतरी जाणवले असेल किंवा तुम्हाला ते भविष्यात कधी जाणवू शकेल. घोटाळेबाजांकडे तुम्ही दुर्लक्ष केलंत तर तुम्ही त्यांचे बळी ठरू शकता.

डेबिट, क्रेडिट कार्डचे घोटाळ्यापासून रक्षण करण्यासाठी तसेच नुकसान कमीत कमी करण्यासाठी या १० टिप्स वाचा…

1. घरात किंवा कामाच्या ठिकाणी तुमचे कार्ड असेच पडून ठेवू नका. तुमच्या कारमध्ये, जिमच्या लॉकरमध्ये, स्विमिंगपूल लॉकरमध्येही तसेच ठेवू नका. चोरांना आकर्षित का करायचे? तुमची कार्डस् रोख रक्कम जशी हाताळाल तशीच ही कार्डे हाताळा.

2. तुम्ही घर किंवा नोकरी बदलाल किंवा जुना फोन नंबर किंवा इमेल अॅड्रेस बदलाल तेव्हा तुमच्या अद्ययावत संपर्काचे तपशील तुमच्या बँकेला कळवा. त्यामुळे तुमच्या कार्डवर काहीही संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळल्यास ते तुम्हाला संपर्क साधू शकतात. तुमच्या बदली किंवा नव्याने जारी केलेल्या कार्डची डिलिव्हरी तुमच्या सध्याच्या पत्त्यावर करणे त्यांना शक्य होईल.

3. तुमच्या कार्डचा पिन कार्डच्या मागच्या बाजूला लिहू नका किंवा पिन मेलर कार्डसोबत ठेवू नका. तुमचा पिन कोणालाही अगदी कुटुंबातील सदस्यांनाही कळवू नका आणि सर्व कार्डसाठी एकच पिन ठेवू नका. तसेच तुम्हाला लक्षात राहण्यास सोपा आणि इतरांना समजण्यास कठीण असा पिन ठेवा. तुमच्यासाठी जे महत्त्वाचे वर्ष असेल तो पिन नसावा कारण अनेकांना असे तपशील माहीत असतात. त्यामुळे तुमचा पिन क्रॅक करणे सोपे होते.

4. तुमच्या आर्थिक आणि वित्तीय नोंदी, सरकारी ओळखपत्रे, क्रेडिट ब्युरो अहवाल आणि वैधानिक दस्तऐवज जसे कर भरणा पावत्या बंदिस्त कपाटात ठेवा. तुमचा मेलबॉक्स अधूनमधून स्वच्छ करा आणि असे कोणतेही दस्तऐवज टाकून देताना फाडून टाका.

5. तुमचा पाकीट किंवा पर्स चोरीला गेल्यास कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला कार्ड नंबर आणि विविध बँकांचे संपर्क क्रमांक तुमच्या लक्षात कसे राहतील? तर पासवर्डसारख्या अॅपचा वापर करा, जेणेकरून तुमच्या कार्डचे तपशील एका एनक्रिप्टेड स्थानिक कंटेनरमध्ये तुमच्या फोन किंवा उपकरणावर साठवले जातील. त्यातून तुमची माहिती सुरक्षितपणे क्लाऊडवर साठवली जाईल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही इंटरनेटने जोडलेल्या डिव्हाइसद्वारे ओळख प्रक्रिया पार पाडून मिळवू शकता. ड्रॉपबॉक्ससारख्या सेवेचा वापर करून तुमचे अर्काइव्ह जिफीमध्ये तयार करा. तुम्ही डेटा सुधाराल किंवा उपकरणे बदलाल किंवा समाविष्ट कराल तेव्हा सर्व डेटा पुन्हा नव्याने टाकण्याऐवजी तो वापरता येईल. हे सिंक्रोनायझेशन महत्त्वाचे आहे.

6. तुमच्या कार्डवर घेण्यात आलेल्या छोट्या रूपया/ डॉलर रकमेसाठी एसएमएस/ इमेल पाहा जे तुम्ही केले नसेल किंवा तुम्हाला अपेक्षित नसेल. लक्षात ठेवा, आपल्या आरबीआयने उचललेल्या पावलांमुळे स्थानिक, कार्ड-नॉट-प्रेझेंट व्यापा-यांकडून (इंटरनेट/ मेल ऑर्डर्स/ सबस्क्रिप्शन मर्चंट्स) यांच्याकडून येणा-या व्यवहारांसाठी सुयोग्य अधिकृतता नियमांबाबत भारत इतर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूप आघाडीवर आहे. परदेशांमध्ये राहणा-या अनेक व्यापा-यांना तुमच्या कार्ड नंबर आणि संपण्याच्या तारखेपेक्षा अधिक कशाचीही गरज नसते आणि ते छोट्या रकमेचा व्यवहार पूर्ण करतात. कार्ड डेटा विविध पद्धतीने गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या कार्डची माहिती असलेली कोणतीही व्यक्ती तुमच्या कार्डचा गैरवापर अशा व्यापा-यांकडे करू शकते. तपासणी व्यवहार पूर्ण झाल्यावर ते जास्त रकमेचे व्यवहार करायचा प्रयत्न करतील. तुम्हाला ओळखता येणार नाहीत अशा छोट्या मूल्याच्या व्यवहारांबाबत कायम सावध राहा. आवश्यकता असल्यास तुमच्या बँकेला फोन करून कार्ड ब्लॉक करून घ्या आणि बदलून घ्या.

7. तुमचे खाते, लॉग ऑन माहिती, पिन, पासवर्ड, ओटीपी, यूपीआय माहिती वैधता संदेश आदी माहिती मागणा-या बँकेकडून आलेल्या कोणत्याही इमेल/ एसएमएस/ व्हॉइस कॉलला प्रतिसाद देऊ नका. ते तुम्हाला काही सेवा बंद करण्यासाठी किंव तुमचे काही माहिती/ तपशील खात्री करण्यासाठी हवे असल्याचे सांगतील. कार्डच्या किंवा बँकेच्या स्टेटमेंटमागे असलेल्‍या बँकेच्या हेल्पलाइन नंबरला फोन करा. गुगल सर्चकडून आलेल्या नंबरवर नको. घोटाळेबाज अशाच प्रकारच्या नावाखाली आपले खोटे नंबर टाकू शकतात. कारण गुगल युजर कम्युनिटीला डेटा एडिट करायची परवानगी देते (चुका दुरूस्त करण्यासाठी आणि सुधारित माहिती देण्यासाठी) आणि घोटाळेबाज त्याचा वापर चुकीच्या उद्दिष्टांसाठी करतात.

8. तुमच्या फोन आणि टॅब्लेट्सवर फक्त विश्वासू अॅप्स वापरा. प्लेस्टोअर किंवा अंड्रॉइड डिव्हायसेसवर अॅप्स डाऊनलोड करण्यापूर्वी प्ले प्रोटेक्ट वापरा. अॅपलच्या अॅपस्टोअरवर वाईट अॅप्स नसल्यामुळे थोडा विश्वास ठेवता येईल.

9. हा सल्ला खूप वेड्यासारखा वाटेल पण तुमच्या फोनवर प्रत्येक अॅपसाठी एक वेगळा लॉक लावून ठेवा. आणि फोन उघडण्यासाठी एक पासवर्ड, बायोमेट्रिक टूल किंवा पॅटर्न लावून ठेवा. अनलॉक करण्यासाठी १० किंवा अधिक चुकीचे पासवर्ड टाकले गेल्यास फोन वाइपआऊट करण्यासारख्या अतिरिक्त सुरक्षा घेणे जास्त योग्य ठरेल.

10. तुमची जागरूकता कायम ठेवा. तुम्हाला लॉटरी/ नोकरीची ऑफर किंवा एखाद्या बड्या असामीनं वारस ठेवलेली संपत्ती यांबाबत माहिती मिळाल्यास आणि तुम्हाला त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केल्यास जागे व्हा आणि त्या मेसेजकडे दुर्लक्ष करा.

(लेखक जनरल मॅनेजर, फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, वर्ल्डलाइन आहेत)