News Flash

Tesla चे सीईओ एलन मस्क देणार तब्बल 730 कोटी रुपये बक्षीस, फक्त करावं लागेल ‘हे’ काम

तब्बल १० कोटी डॉलर (७३० कोटी रुपये) बक्षीस देण्याची केली घोषणा

जगातील सर्वात मोठी ईलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी वातावरणातील वाढतं कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन कमी करणाऱ्या कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी १० कोटी डॉलर ( जवळपास ७३० कोटी रुपये) बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मस्क यांनी गुरूवारी ट्विटरवर याबाबत घोषणा केली.

(‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में…’ TATA च्या ट्विटमुळे चर्चांना उधाण)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असलेल्या एलन मस्क यांनी वातावरणातील वाढत्या कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी व्हावं या हेतूने ही घोषणा केली आहे. “मी कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या सर्वोत्तम टेक्नॉलॉजीसाठी 100 मिलियन डॉलर दान देत आहे “, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलंय. यासोबतच याबाबतची सविस्तर माहिती पुढील आठवड्यात दिली जाईल असंही त्यांनी अजून एक ट्विट करुन स्पष्ट केलंय.


कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान म्हणजे वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करणारं तंत्रज्ञान होय. जगभरात ग्लोबल वॉर्मिंग महत्त्वाचा विषय बनला असून हवामानात झालेला बदल पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे.

(‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में…’ TATA च्या ट्विटमुळे चर्चांना उधाण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 8:46 am

Web Title: tesla spacex ceo elon musk to offer 100 million dollar prize for best carbon capture technology sas 89
Next Stories
1 लाँचिंगआधीच जबरदस्त ‘हिट’ ठरतोय ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम, प्री-रजिस्ट्रेशनचा आकडा 40 लाखांपार
2 5.62 लाख भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी : सीबीआयने Cambridge Analytica विरोधात दाखल केला गुन्हा
3 ‘या’ वेळेमध्ये नका वापरू Google Pay-PhonePe सारखे UPI अ‍ॅप्स, NPCI ने दिली महत्त्वाची माहिती
Just Now!
X