दिवसभरात कडक उन्हाच्या झळा आणि रात्री हवेत गारवा या मिश्र वातावरणामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. मात्र गेल्या आठवड्याभरात हवेत गारवा वाढला आहे. लवकरच थंडीला सुरूवात होणार आहे. तेव्हा यापुढील हिवाळ्याच्या चार महिन्यात आहार कसा असावा कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबद्दल जाणून घेऊयात थोडक्यात

– हिवाळ्यात आवर्जून अक्रोड, बदाम, दही, पालक यांचा समावेश आहारात केला पाहिजे.
– मांसाहर करणाऱ्यांनी कोळंबी, ऑयस्टर, चिकन या पदार्थांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये झिंक हे मूलद्रव्य असतं. रोगकारक विषाणू-जीवाणूंवर हल्ला चढविण्यासाठी आपल्या पांढऱ्या पेशींना हे मूलद्रव्य पुरेशा प्रमाणात मिळणं आवश्यक आहे.
– या शिवाय मशरूम, तृणधान्य, ओट्स, जवस, मोड आलेल्या कडधान्याचाही समावेश करावा.
– ताक, सोयामिल्क, टोफू, शेंगवर्गीय भाज्या, फळभाज्यांची लोणची यांसारख्या प्रोबायोटिक पदार्थाचा वापर करा. यामुळे शरीराला चांगले असणारे बॅक्टेरिया अनारोग्यदायी बॅक्टेरिया बाहेर ढकलण्याचं काम करतात. मूलद्रव्यांचं शोषण व्यवस्थित होतं आणि आरोग्य सुधारतं.
– शतावरी, कांद्याची पात, लसूण, रताळे, कोबी, सफरचंद आणि हिरव्या पालेभाज्या आवर्जून खा.

– उन्हाळ्यामध्ये भरपूर घाम येऊन तहान लागत असल्याने आपण भरपूर पाणी पितोपण हिवाळ्यामध्ये हवेतील बाष्प कमी झाल्याने आणि थंड वातावरणामुळे घाम येत नाही. थेट तुमच्या त्वचेतून पाणी शोषले जाते, त्यामुळे तुम्हाला घाम येत नसला तरीही तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्यप्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. म्हणूच या काळात भरपूर पाणी आणि भाज्यांचे सूप प्या.
– हिवाळ्यात त्वचेचे आजाराही उद्भवतात. म्हणूनच ज्यात ओमेगा ३ फॅट्स असतील असे पदार्थही खा. ओमेगा ३ फॅट्समुळे शरीरातील फॅटचे प्रमाण नियंत्रित होते आणि पेशींची डीहायड्रेशनपासूनही सुटका होते. ओमेगा ३ फॅट्समुळे शरीरावरील सूज कमी होते, त्वचा कोरडी होत नाही. थंडीमुळे वाढणाऱ्या सुरकुत्या येत नाही आणि त्यामुळे कांती उजळ होते. म्हणूच मासे, बाजरी, सोयाबीन, पालक, यांचाही समावेश आहारात असू द्या.