केसांचं आरोग्य जर निरोगी राखायचं असेल तर त्यांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. लांबसडक, काळेभोर केस असावेत अशी प्रत्येक तरुणीची इच्छा असते. मात्र असे केस मिळविण्यासाठी केसांना दररोज तेल लावणं गरजेचं आहे. केसांना दररोज तेल लावल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात. त्यासोबतच डोक्यावरील त्वचेसाठीही तेल तितकंच गरजेचं असतं. तेलामुळे डोक्यावरील त्वचेला पोषण मिळतं. तसंच रक्तपुरवठाही सुरळीत होतो.

केसांसाठी नारळाचं तेल, बदामाचं तेल किंवा मोहरीचं तेल विशेष गुणकारी असतं. या तेलाचा वापर केल्यामुळे केस काळेभोर आणि घनदाट होण्यास मदत होते. मात्र तेलाचा वापर करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात तेल लावताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी

Suke Bombilcha Phodnicha Bhat Recipe In Marathi
उरलेल्या भाताचा करा सुके बोंबील घालून मऊ मोकळा भात; १ खास युक्ती-आवडीने खातील सगळे
Bombil Khengat Recipe In Marathi bombil fish recipe in marathi
“बोंबलाचे खेंगाट” गृहिणींनो ‘ही’ रेसिपी एकदा नक्की ट्राय करा; केस गळती होईल कायमची दूर
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

१. डोक्यावरील त्वचेकडे लक्ष देणे-
तेल लावताना डोक्यावरील त्वचेकडे लक्ष देणे विशेष गरजेचं आहे. त्यासोबतच केसांच्या मूळाकडेही तितकंच लक्ष द्यावं लागतं. केसांची मूळ मजबूत असतील तर केसांची वाढ लवकर होते. त्यासोबतच केसांची गळतीदेखील होत नाही. डोक्यावर नारळाच्या तेलाने मसाज केल्यास याचा परिणाम लवकर दिसून येतो.

२. रोज केसांना मसाज करावा –
केसांच्या आरोग्यासाठी केसांना केवळ तेल लावणं हा उपाय नाही तर तेल लावण्यासोबतच केसांच्या मूळांना मसाज करणंदेखील गरजेचं आहे. मसाज करण्यासाठी शक्यतो कोमट तेलाचा वापर करावा. कोमट तेलाने मसाज केल्यामुळे केसांची मूळं बळकट होतात.

या गोष्टी टाळाव्यात

१. तेल लावणं कधीही विसरु नका –
केसांना तेल लावल्यामुळे अनेक वेळा केसांमध्ये चिकटपणा निर्माण होतो, अशी तक्रार महिला वर्गातून येत असते. त्यामुळे अनेक वेळा तरुणी केसांना तेल लावण्याचं टाळतात. मात्र केसांना तेल न लावण्याची चूक कधीही करुन नका. केसांच्या वाढीसाठी तेल लावणं महत्वाचं आहे. घराच्या बाहेर पडल्यानंतर केसांना धूळ,माती,प्रदूषण या साऱ्या घटकांचा सामना करावा लागतो. त्यामुळे केस कोरडे होतात. परिणामी केसांचं गळण्याचं आणि केस तुटण्याचं प्रमाण वाढतं. या साऱ्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी केसांना तेल लावणं गरजेचं आहे.

२. तेल किंवा शाम्पूचा अतिरेकही करु नये –
कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली तर त्याचे दुष्परिणामही सहन करावे लागतात. त्यामुळे तेल असो किंवा शाम्पू दोघांचाही वापर प्रमाणात असावा. जर डोक्यावर तेलाचा जास्त मारा झाला तर डोक्यावरील भार वाढतो आणि केसदेखील तेलकट दिसून लागतात.